पानसरे यांच्या मारेकºयांचा शोध घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 01:23 AM2018-02-22T01:23:59+5:302018-02-22T01:24:11+5:30
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते पुरोगामी विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्त्येचा जलदगतीने तपास करून दोषींना अटक करावी, अशी मागणी भाकपच्या वतीने करण्यात आली. भाकपच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे एकत्र येऊन घोषणाबाजी करत पानसरे यांच्या खुनाचा निषेध नोंदविला
नाशिक : भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते पुरोगामी विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्त्येचा जलदगतीने तपास करून दोषींना अटक करावी, अशी मागणी भाकपच्या वतीने करण्यात आली. भाकपच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे एकत्र येऊन घोषणाबाजी करत पानसरे यांच्या खुनाचा निषेध नोंदविला पानसरे यांच्या खुनाच्या घटनेला तीन वर्षे उलटूनदेखील अद्याप त्यांच्या मारेकºयांना अटक करून कायदेशीर शिक्षा देण्यास सरकारी यंत्रणा अपयशी ठरत आहे. ज्या संशयितांना अटक करून न्यायालयापुढे हजर केले त्यांनाही जामीन मिळाला असून ते मुक्त फिरत आहे. महाराष्टÑ अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकºयांनाही बेड्या ठोकण्यास हे सरकार अपयशी ठरल्याचे जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
सरकारी तपासी यंत्रणेने त्वरित दाभोलकर, पानसरे यांच्या मारेक ºयांचा शोध घेऊन त्यांना कठोर शिक्षा करावी, अन्यथा तीव्र आंदोलन भाकपच्या वतीने छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदनावर जिल्हा सचिव कॉमे्रड दत्तू तुपे, सचिव भास्करराव शिंदे, महादेव खुडे, राजू देसले आदिंच्या स्वाक्षºया आहेत. एकूणच पुरोगामी विचारवंतांचा महाराष्टÑासारख्या राज्यात खून होऊन तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधी उलटून जातो. मात्र तरीदेखील आरोपींचा शोध तपासी यंत्रणेला लागत नाही, याबाबत संताप व्यक्त करण्यात आला. सरकारकडून राज्यात दडपशाही राबविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही निवेदनातून करण्यात आला आहे.