आत्मानंदासाठी धडपडणाऱ्या माणसांसाठी वारी हा एक शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 01:16 AM2018-07-16T01:16:42+5:302018-07-16T01:16:59+5:30

सुमारे सातशे वर्षे झालीत. कोणतीही आमंत्रणं न देता अव्याहतपणे प्रत्येक ज्येष्ठ वद्य अष्टमीस पंढरपूरची वारी करण्याकरिता वारकरी मोठ्या संख्येने आळंदीला जमत असतात. प्रचंड उत्साहाने लाखो वारकºयांच्या उपस्थितीत हा सोहळा दरवर्षी संपन्न होतो. दिंड्या, पताका, टाळमृदंगाच्या गजरात शेकडो वारकरी पायी ही वारी करतात.

A search for people who are struggling for the soul struggle is a search | आत्मानंदासाठी धडपडणाऱ्या माणसांसाठी वारी हा एक शोध

आत्मानंदासाठी धडपडणाऱ्या माणसांसाठी वारी हा एक शोध

Next

प्रा़ डॉ. कमल अहेर - कुवर
सुमारे सातशे वर्षे झालीत. कोणतीही आमंत्रणं न देता अव्याहतपणे प्रत्येक ज्येष्ठ वद्य अष्टमीस पंढरपूरची वारी करण्याकरिता वारकरी मोठ्या संख्येने आळंदीला जमत असतात. प्रचंड उत्साहाने लाखो वारकºयांच्या उपस्थितीत हा सोहळा दरवर्षी संपन्न होतो. दिंड्या, पताका, टाळमृदंगाच्या गजरात शेकडो वारकरी पायी ही वारी करतात. त्यात वयाच्या ओझ्याने वाकलेला, काठी टेकत चालणारा भक्त असतो. तेलमीठ-पीठाचे ओझे डोक्यावर, कडेवर लहान मूल घेऊन चालणारी कष्टकरी स्त्री असते. भोळे भाबडे भक्त असतात. तत्त्वज्ञ असतात. विचारवंत असतात. समाजशास्त्रज्ञही
असतात.
वारकरी संप्रदाय हे उदार, चिंतनशील, संस्कारजन्य भक्तांना सामावून घेणारे उपासनापीठ आहे. धार्मिक प्रबोधनाच्या प्रेरणेतून तो जन्माला आला. ज्ञानेश्वर, तुकाराम इ. संतांचे कार्य केवळ सांप्रदायिक स्वरूपाचे नसून ती एक व्यापक चळवळ होती.
पंढरपूरचा पांडुरंग हे त्यांचे उपास्यदैवत. प्रत्येक वारकºयाच्या मनामध्ये असणारी विठ्ठलभेटीची आस वारीतून पूर्ण होते. यात सर्व जातिधर्माचे, पंथाचे स्त्री-पुरुष असतात. जन्मसिद्ध अधिकार, उच्चनीचतेला यात थारा नसतो.
आत्मसंस्कार, आत्मानंद, आत्मशोध यासाठी धडपडणाºया माणसासाठी वारी हा एक शोध आहे. कोणत्याही प्रकारच्या अभिमानाला येथे जागा नाही. सर्व प्रकारच्या उपाधी झुगारून ईश्वरापुढे एक माणूस म्हणून नम्र होणे येथे आहे.
स्वार्थांधता, जीवघेणी स्पर्धा, कुटुंबसंस्थेचे विघटन, शहरांचे बकालपण, हिंस्रता, सर्वांना वेढून टाकणारा एकाकीपणा या गोष्टी आधुनिक काळात दर दिवशी वाढत आहेत.
बौद्धिक विकास झाला; परंतु नैतिकता उंचावली गेली नाही. उलट अलीकडच्या काळात ती क्षीण क्षीण होताना दिसत आहे.
‘जे जे भेटे भूत,
ते ते मानिजे भगवंत’
म्हणून आपली विचारांची कक्षा व्यापक करणारा, निसर्गाचे सान्निध्य लाभल्यामुळे ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे’चा अनुभव साक्षात करणारा वारी हा एक समृद्ध करणारा अनुभव आहे. मराठी भाषा, साहित्य-संस्कृती याविषयी स्वत्वाची भावना निर्माण करून सामाजिक सामरस्याची भावना त्यामुळे जागवली जाते. वारकºयाचा भक्तिभावनेने ओथंबलेल्या मनाचा हा अंत:स्तरावरचा प्रवास मला महत्त्वाचा वाटतो.
(लेखक संत साहित्याच्या अभ्यासक)

Web Title: A search for people who are struggling for the soul struggle is a search

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.