स्मार्ट फोनद्वारे शोधा नावासह मतदान केंद्र : संगणकीय कार्यप्रणाली

By admin | Published: February 18, 2017 09:10 PM2017-02-18T21:10:16+5:302017-02-18T21:10:16+5:30

महापालिका निवडणुकीसाठी येत्या २१ फेबु्रवारीला मतदान घेण्यात येणार असून, मतदारांना आपल्या नावासह मतदान केंद्र तातडीने शोधता यावे,

Search by Smart Phone Polling Station with Name: Computing Functionality | स्मार्ट फोनद्वारे शोधा नावासह मतदान केंद्र : संगणकीय कार्यप्रणाली

स्मार्ट फोनद्वारे शोधा नावासह मतदान केंद्र : संगणकीय कार्यप्रणाली

Next

नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी येत्या २१ फेबु्रवारीला मतदान घेण्यात येणार असून, मतदारांना आपल्या नावासह मतदान केंद्र तातडीने शोधता यावे, याकरिता महापालिकेने संगणकीय कार्यप्रणाली विकसित करत त्यावर सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मतदारांना संगणक अथवा स्मार्ट फोनद्वारे नावासह मतदान केंद्र शोधणे सुलभ होणार आहे.
महापालिकेने राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्रनिहाय मतदार यादी मनपाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. तथापी सदर मतदार यादी ही पी.डी.एफ. फॉर्मेटमध्ये असल्याने यादीतून मतदारांना आपले नाव व मतदान केंद्र शोधणे सोयीचे व्हावे, याकरिता सर्व ३१ प्रभागांची यादी संकेतस्थळावर शोधणेसाठी आॅनलाइन सर्च सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे मतदारांना संगणकावर किंवा स्मार्ट फोनद्वारे आपले नाव व मतदान केंद्र शोधणे सुलभ होणार आहे. नाशिक महापालिकेच्या ‘स्मार्ट नाशिक’ या मोबाइल अ‍ॅपवरदेखील सदर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याकरिता मतदारांनी गूगल प्ले स्टोअरवरून स्मार्ट नाशिक अ‍ॅप डाऊनलोड करणे अथवा अपडेट करणे आवश्यक आहे. या कार्यप्रणालीद्वारे मतदारांना आपल्या नावातील काही आद्याक्षरे वापरून किंवा मतदान ओळखपत्र क्रमांक वापरून तत्काळ आपले नाव मतदान यादीतून शोधता येणार आहे. मतदारांना त्यांचे नाव कोणत्या मतदान केंद्रात आहे, याचीदेखील या कार्यप्रणालीद्वारे माहिती मिळणार आहे.

Web Title: Search by Smart Phone Polling Station with Name: Computing Functionality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.