फसवणूक प्रकरणी तलाठी थूल यांचा शोध सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:32 AM2021-09-02T04:32:16+5:302021-09-02T04:32:16+5:30

येवला : तालुक्यातील हडपसावरगाव येथील तलाठी अतुल शंकर थूल यांच्याविरूध्द तालुका पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून तालुका पोलिसांकडून ...

Search for Talathi Thul continues in fraud case | फसवणूक प्रकरणी तलाठी थूल यांचा शोध सुरू

फसवणूक प्रकरणी तलाठी थूल यांचा शोध सुरू

Next

येवला : तालुक्यातील हडपसावरगाव येथील तलाठी अतुल शंकर थूल यांच्याविरूध्द तालुका पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून तालुका पोलिसांकडून तलाठी थूल यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अनिल भवारी यांनी दिली.

तालुक्यातील हडप सावरगाव येथील शेत गट नं. ५७/३ या शेतजमीन बोगस मृत्यूपत्राद्वारे पत्नी अरुणा जगन्नाथ गाजरे यांचे नाव लावल्याबाबत मूळ मालकाच्या वारस मंदा पवार यांनी तहसीलदार प्रमोद हिले यांचेकडे तक्रार दाखल केली होती. हिले यांनी याबाबत मंडळ अधिकारी अशोक भिकाजी गायके यांना याबाबत चौकशी करून अहवाल सादर करण्याची सूचना केली होती.

या अहवालात तलाठी थूल दोषी आढळल्याने तालुका पोलिसात मंडल अधिकारी गायके यांनी थूल यांच्याविरूध्द फिर्याद दाखल केली. तालुका पोलिसांनी थूल यांच्या विरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक एकनाथ भिसे हे करत आहेत.

तलाठी थूल यांनी तालुक्यातील ८ एकर जमीन मृत्यूपत्रावरून पत्नी अरुणा जगन्नाथ गाजरे यांचे नावे केली होती. दरम्यान, मूळ मालकाच्या वारस मंदा पवार वारसनोंदीसाठी गावी आल्यानंतर सदर प्रकार उघडकीस आला होता. याबरोबरच तलाठी थुल यांनी स्वतःच्या पत्नी व नातेवाईकांच्या नावे अनेकांचे शासकीय अनुदान लाटल्याच्या तक्रारीही प्राप्त झाल्याने याप्रकरणी स्वतंत्र चौकशी सुरू असल्याचे तहसिलदार हिले यांनी सांगीतले.

चौकट...

येवला उपविभागीय अधिकारी सोपान कासार यांचे विरूध्द शहर पोलिसात महिला तलाठ्याचा विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल झाला. शहर पोलिसांनी प्रांताधिकारी कासार यांना अटक करून येवला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना जामीनही मंजूर केला आहे. सदर प्रकरणाने येवला राज्यभर चर्चेत आले. त्या पाठोपाठ तलाठी थुल यांचे प्रकरण पुढे आल्याने पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या मतदारसंघातील महसुल यंत्रणा चर्चेचा विषय ठरली आहे.

Web Title: Search for Talathi Thul continues in fraud case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.