होम कोरंटाइन असलेल्या दोघा विदेशींचा घेतला शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 09:46 PM2020-03-26T21:46:08+5:302020-03-26T23:04:06+5:30
अश्विननगरमध्ये होम कोरंटाइन असलेल्या दोन विदेशी नागरिकांना महापालिकेच्या आरोग्य विभागाने पोलिसांच्या सहकार्याने ताब्यात घेतले. या व्यक्तींची रवानगी पंचवटी येथे उभारण्यात आलेल्या विशेष विलगीकरण कक्षात स्थलांतरीत करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
सिडको : अश्विननगरमध्ये होम कोरंटाइन असलेल्या दोन विदेशी नागरिकांना महापालिकेच्या आरोग्य विभागाने पोलिसांच्या सहकार्याने ताब्यात घेतले. या व्यक्तींची रवानगी पंचवटी येथे उभारण्यात आलेल्या विशेष विलगीकरण कक्षात स्थलांतरीत करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
तैवान देशातील कंपनीशी संलग्न असलेली कंपनी अंबड औद्योगिक वसाहतीत आहे. तैवान देशातून दोन नागरिक अंबड औद्योगिक वसाहतीतील कंपनीत आले होते. सदर कंपनी मालकाने या व्यक्तींची राहण्याची व्यवस्था अश्विनीनगर येथील बंगल्यात केली होती. सदर व्यक्ती हे चार-पाच दिवसांपासून येथे वास्तव्यास होते. त्यांची तपासणी केली असता त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला असून, त्यांना १४ दिवसांसाठी होम कोरंटाइनमध्ये ठेवले होते. परंतु ते परिसरात फिरत होते. नागरिकांनी मनपा आरोग्य विभाग व पोलिसांना त्यांची माहिती दिली. मनपा आरोग्य विभागाचे अधिकारी व अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक शिंदे यांनी अश्विननगर येथे जाऊन या विदेशी नागरिकांना ताब्यात घेऊन महापालिकेच्या स्वाधीन केले.
मनपाने त्यांची रवानगी पंचवटी तपोवनात उभारण्यात आलेल्या कोरोना कोरंटाइनमध्ये केल्याचे पोलिसांनी सांगितले.