मासेमारीसाठी गेलेल्या तरुणाचे शोध कार्य सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 04:02 PM2019-09-09T16:02:04+5:302019-09-09T16:02:46+5:30

कुटुंबीयांसह ग्रामस्थ त्याच्या प्रतीक्षेत

The search for a young boy goes fishing | मासेमारीसाठी गेलेल्या तरुणाचे शोध कार्य सुरूच

मासेमारीसाठी गेलेल्या तरुणाचे शोध कार्य सुरूच

Next
ठळक मुद्देत्र्यंबकेश्वरचे तहसीलदार दीपक गिरासे हे लक्ष परिस्थितीवर लक्ष ठेऊन

वेळुंजे : तालुक्यातील वावीहर्षे येथील पिंटू वाळू शिद (१८) हा तरु ण गेल्या गुरुवारी (दि.५) सकाळी ७ वाजेच्या सुमारास वैतरणा-आळवंडी धरणात मासेमारी गेला होता. मात्र, काठावर त्याचे कपडे व मोबाईल आढळून आले असून तो बेपत्ता झाल्याचे लक्षात आले. गेल्या पाच दिवसांपासून शोधकार्य सुरू असून कुटुंबीयांसह ग्रामस्थ त्याच्या प्रतीक्षेत आहेत.
पिंटू शिद हा ट्यूबवर बसून मासेमारीसाठी लावलेले जाळे काढण्यासाठी गेला होता. परंतु, त्याची ट्यूब कडेला लागली तेव्हा अन्य मासेमारी करणाऱ्यांना तो बेपत्ता झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर शोध कार्य सुरू करण्यात आले. शासकीय यंत्रणा देखील यात मदत कार्य करत आहे. त्र्यंबकेश्वरचे तहसीलदार दीपक गिरासे हे लक्ष परिस्थितीवर लक्ष ठेऊन असून पाच दिवसांपासून कुठलाच ठाव ठिकाणा न लागल्याने तरु णाचे कुटुंबिय शोध कार्याकडे डोळे लावून बसले आहे.
शोध कार्य चालूच राहील
शोध कार्य चालू आहे. आम्ही घटना झाली तेव्हा पासून परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत. शोध कार्य चालूच राहील, परंतु कुणाला आढळून आल्यास त्यांनी प्रशासनाशी तत्काळ संपर्क साधावा.
- दीपक गिरासे, तहसिलदार, त्र्यंबकेश्वर

Web Title: The search for a young boy goes fishing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.