दिवाळी सुटीच्या हंगामात  नाशिककर गाठणार समुद्रकिनारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 01:28 AM2018-10-29T01:28:45+5:302018-10-29T01:30:01+5:30

दिवाळी सुटीच्या हंगामात नाशिककरांनी देशाटनासाठी घराबाहेर पडण्याचे नियोजन केले आहे. यंदा देशांतर्गत पर्यटनाला अधिक पसंती दिली जात असून, केरळ वगळता कोकण, गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांसह गड-किल्ल्यांच्या गावांना पसंती दिली जात असल्याचे पर्यटन व्यावसायिकांनी सांगितले.

 Seaside to be reached in Nashik during Diwali holidays | दिवाळी सुटीच्या हंगामात  नाशिककर गाठणार समुद्रकिनारे

दिवाळी सुटीच्या हंगामात  नाशिककर गाठणार समुद्रकिनारे

Next

नाशिक : दिवाळी सुटीच्या हंगामात नाशिककरांनी देशाटनासाठी घराबाहेर पडण्याचे नियोजन केले आहे. यंदा देशांतर्गत पर्यटनाला अधिक पसंती दिली जात असून, केरळ वगळता कोकण, गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांसह गड-किल्ल्यांच्या गावांना पसंती दिली जात असल्याचे पर्यटन व्यावसायिकांनी सांगितले.
दिवाळीच्या पार्र्श्वभूमीवर शाळा-महाविद्यालये, कार्यालयांना सुटी असते. तीन ते चार दिवसांचा सण आटोपताच सुटीचा आनंद लुटण्यासाठी नाशिककर घराबाहेर पडण्याच्या बेतात आहेत. पर्यटनाच्या नियोजनामध्ये नागरिकांकडून माथेरान, अंबोली, महाबळेश्वर, पाचगणी, सातारा, पुणे, लोणावळा-खंडाळा, गोवा, कोकण आदी भागांचा समावेश आहे. पर्यटन विकास महामंडळाकडे बहुतांश नागरिकांनी नोंदणी केली आहे. त्यामुळे कोकण पर्यटकांच्या गर्दीने फुलणार आहे.
येवा, कोकण आपलोच आसा...
यंदा दिवाळीच्या हंगामात कोकणातील तारकर्ली, रत्नागिरी, गणपती पुळे, गुहागर, हरिहरेश्वर, वेलनेश्वर, दिवे-आगर, आवास, मालवण, रेवदंडा, अलिबाग असे सुमारे बारा ते पंधरा समुद्रकिनारे कोकणाला लाभलेले आहेत. तसेच भेरलीमाड, राया, आंबा, सुपारी, केळी, फणस, नारळ, काजू, कोकम यांसह भातशेती हे कोकणचे वैशिष्ट्य मानले जाते. कोकण पर्यटनामध्ये बहुतांश पौराणिक मंदिरांना भेटी देत धार्मिक पर्यटनासह सागरी व नैसर्गिक पर्यटनाचाही आनंद लुटता येतो. याबरोबरच विजयदुर्ग, मुरूड-जंजिरा, महाडजवळील रायगड या किल्ल्यांची भटकंती करत दुर्ग पर्यटनही पूर्ण करता येते.
निसर्गाच्या सान्निध्यात ‘दिवाळी’
नाशिककर कोकणातील समुद्रकिना-यांसह गोवा, कर्नाटकसह थंड हवेच्या ठिकाणी जाण्याचे बेत आखत आहेत. निसर्गाच्या सान्निध्यात मनमुरादपणे आनंद लुटत दिवाळी साजरी करणार आहेत. महाबळेश्वर, पाचगणी, माथेरान यांसारख्या थंड हवेच्या ठिकाणांचीही भुरळ पडत आहे. पर्यटन महामंडळाचे रिसॉर्ट हाउसफुल्ल झाले आहेत. आगाऊ नोंदणी करत नागरिकांनी देशाटनाची तयारी केली आहे.
पर्यटकांचा यावर्षी केरळकडे जाण्याचा ओघ अत्यंत कमी आहे. त्याऐवजी नागरिकांकडून कोकण परिसरातील समुद्रकिनाºयांसह गोव्याची निवड केली जात आहे. कोकण टूरसाठी पर्यटकांची संख्या अधिक आहे. भारतातील पश्चिम समुद्रकिनारा आणि सह्याद्रीची पर्वतरांग लाभलेल्या कोकणमधील निसर्गसौंदर्याचा अनुभव पर्यटकांकडून मोठ्या संख्येने लुटला जाणार आहे.
पर्यटन विकास महामंडळासह खासगी पर्यटन व्यावसायिकांकडेही पर्यटकांनी ‘कोकण पॅकेज’ची नोंदणी केली आहे. तसेच महाराष्टÑाबाहेर राजस्थान राज्याच्या पर्यटनालाही प्राधान्य देत आहेत. राजस्थानमधील गड-किल्ले, वाळवंट बघण्यासाठी जयपूर, जोधपूर, जैसलमेर यांसारख्या शहरांची पर्यटकांकडून निवड केली जात आहे.

Web Title:  Seaside to be reached in Nashik during Diwali holidays

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.