हंगाम : आतापर्यंत ५२ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण

By admin | Published: February 24, 2016 10:47 PM2016-02-24T22:47:29+5:302016-02-24T22:48:28+5:30

वसाका देणार १५०५चा पहिला हप्ता

Season: So far, 52 thousand metric tonnes of sugarcane finishes | हंगाम : आतापर्यंत ५२ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण

हंगाम : आतापर्यंत ५२ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण

Next

नाशिक : अवसायानातून सुरू झालेल्या वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याने पहिल्याच वर्षात उद्दिष्टापेक्षा किंचित जास्तच उसाचे गाळप करण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू केली आहे. येत्या २५ मार्चपर्यंत वसाकाचा हंगाम चालू राहणार असून आधी निश्चित केलेल्या एक लाखापेक्षा ५० हजार मे. टन जादाचे गाळप कारखाना वेळेत पूर्ण करेल, अशी माहिती प्रशासकीय मंडळातील सदस्य जि.प. सभापती केदा अहेर यांनी दिली.
केंद्र सरकारच्या नियमाप्रमाणे एकूण गाळपाच्या साडेनऊ टक्के साखरेचे प्रमाण (उतारा) असेल तर किमान २३०० रुपये हमीभाव देण्याचे आदेश आहेत; मात्र वसाकाची गाळपाची सरासरी पाहता वसाकाचा सारखेचा उतारा (रिकव्हरी) साडेदहा टक्क्याच्या आसपास राहण्याची शक्यता असल्याने उसाला २५४२ रुपये भाव देण्याची तयारी आहे.
(पान ७ वर)
त्यात ऊस वाहतूक दर कमी करण्यात येऊन हे दर १९५० च्या आसपास राहतील. ऊस वाहतूक दर ५७४ रुपये इतके राहतील, शिवाय जाड आणि बारीक साखरेच्या उत्पादनात ६० टक्के एम-३० तर ४० टक्के एस-३० साखरेचे उत्पादन करण्यात येईल. एम-३० साखरेला तुलनेने १०० रुपये जादाचे भाव असतात. आतापर्यंत ५२ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करण्यात आले असून ४९ हजार मे. टन सारखेचे पोते तयार आहेत. या साखरेच्या पोत्यावर राज्य शिखर बॅँकेचा २०० रुपये तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचा ३०० रुपये बोजा आहे. येत्या २५ मार्चपर्यंत वसाकाचे गाळप सुरू राहणार असून या कार्यकाळात दीड लाख मे. टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. वसाकातील कामगारांना या हंगामाचा तत्काळ अग्रीम देण्याची तयारी पूर्ण झाल्याची माहिती व्यवस्थापक बी. बी. देसले यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारखान्याच्या गाळपाच्या उद्घाटनालाच कारखाना सुरू झाला, आता मात्र तो असाच कायम सुरू राहील, याची जबाबदारी आमदार डॉ. राहुल अहेर, केदा अहेर व या परिसरातील शेतकऱ्यांकडून अपेक्षा व्यक्त केली होती. (प्रतिनिधी)

Web Title: Season: So far, 52 thousand metric tonnes of sugarcane finishes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.