सिकॉफवर अवसायक नियुक्त

By admin | Published: October 9, 2016 01:47 AM2016-10-09T01:47:43+5:302016-10-09T01:48:44+5:30

अनधिकृत बांधकाम भोवले : सहकार उपनिबंधकांची कारवाई

Secaucus appointed a resident | सिकॉफवर अवसायक नियुक्त

सिकॉफवर अवसायक नियुक्त

Next

गोकुळ सोनवणे ल्ल सातपूर
संस्था नोंदणी करतेवेळी मंजूर केलेला आराखडा आणि अस्तित्वात असलेल्या इमारतीचा प्लॅन यात मोठी तफावत असल्याने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व सहकारी संस्थेच्या अटी, शर्तीचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत सहकारी संस्थेच्या उपनिबंधकांनी सातपूर येथील सिकॉफ (एसएसआय फ्लॅटेड सहकारी संस्था) ही औद्योगिक संस्था अवसायनात घेण्याचा आदेश पारित केला असून, संस्थेवर अवसायकाची नेमणूक केली आहे, अशा प्रकारची कारवाई प्रथमच होत असल्याने उद्योग क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
सातपूर औद्योगिक वसाहतीत १९९३ साली सिकॉफ (एसएसआय फ्लॅटेड इस्टेट) या औद्योगिक संस्थेची सहकारी संस्था म्हणून नोंदणी झाली आहे. या संस्थेचे जवळपास ३६५ गाळे (उद्योग) असून महाराष्ट्रातील सर्वांत मोठी सहकारी औद्योगिक वसाहत म्हणून त्याकाळी या संस्थेचा गौरव झाला होता. तसेच इमारत पूर्णत्वाचा दाखला घ्यावा, असे वेळोवेळी पत्र संस्थेला देण्यात आले आहे. संस्थेचे पदाधिकारी दुर्लक्ष करीत आहेत आणि संस्थेकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती सादर करावी, असे उपनिबंधकांनी पत्राद्वारे कळविले होते. संस्थेने समाधानकारक खुलासा केला नाही आणि सबळ पुरावेदेखील सादर केले नाहीत. त्यामुळे ज्या उद्देशासाठी ही संस्था स्थापन झाली आहे तो उद्देशच सफल होत नसल्याचा ठपका उपनिबंधकांनी ठेवला आहे. त्यामुळे ही संस्था अवसायानात काढण्याचे आदेश देत अवसायन कामकाज पाहण्यासाठी सहकार अधिकारी आर. सी. गजरे यांची अवसायक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. संस्थेच्या अध्यक्षांनी दप्तराचा आणि मालमत्तेचा ताबा अवसायकांना द्यावा, असाही आदेश उपनिबंधकांनी बजावला आहे. पुढील सुनावणी २१ रोजी होणार आहे.

Web Title: Secaucus appointed a resident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.