नाशिक शहरात अडीच लाख नागरिकांना दुसरा डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:12 AM2021-09-13T04:12:51+5:302021-09-13T04:12:51+5:30
नाशिक शहराची लोकसंख्या सुमारे १७ लाख लोकसंख्या आहे. त्यातील १ ते १८ वर्षे वयोगटांतील मुले वगळता, १४ लाख नागरिकांना ...
नाशिक शहराची लोकसंख्या सुमारे १७ लाख लोकसंख्या आहे. त्यातील १ ते १८ वर्षे वयोगटांतील मुले वगळता, १४ लाख नागरिकांना कोराेना प्रतिबंधक लस देण्याचे उद्दिष्ट आहे. आत्तापर्यंत ६ लाख ५० हजार ८६१ नागरिकांना पहिला डाेस देण्यात आला असून, दोन्ही डाेस दिलेल्या नागरिकांची संख्या २ लाख ४३ हजार ५४३ इतकी आहे, तर पहिला आणि दुसरा डाेस मिळून एकूण ८ लाख ९४ हजार ४०४ नागरिकांना डाेस देण्यात आले आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिली.
कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर लसीकरणाला गर्दी वाढली, परंतु त्याच वेळी सर्वत्र डोस उपलब्ध होत नसल्याने नागरिकांचे हाल झाले. अनेक दिवस डोसच नसल्याने लसीकरण अधूनमधून सुरू होते. दुसऱ्या लाटेचा कहर बघता, नागरिकांना लसीकरण आवश्यक वाटू लागल्याने लसीची मागणी वाढली, परंतु मोजक्याच केंद्रांवर लसीकरण हेात असल्याने, नागरिकांना त्याच ठिकाणी गर्दी करावी लागत हेाती. नाशिक रोडच्या सिन्नर फाटा परिसर, सिडकोसह अनेक भागांत लसीकरणासाठी नागरिक पहाटे पाचपासून नंबर लावत होते. अनेक जण तर नाश्त्याचे डबेही तेथेच घेऊन येत होते. मात्र, आता गेल्या काही दिवसांपासून बऱ्यापैकी लस उपलब्ध झाल्या आहेत. त्यातच नगरसेवकांच्या मागणीनुसार, प्रशासनाने लसीकरण केंद्रे वाढविली आहेत. तेथे खूप मोठ्या प्रमाणात डाेस उपलब्ध होत नसले, तरी घराच्या परीसरात डाेस उपलब्ध होत असल्याने गर्दी विकेंद्रित हेाण्यास मदत झाली आहे.
छायाचित्र--- नाशिक शहरातील सिडको येथील दत्तनगर येथील लसीकरण केंद्रात शनिवारी (दि.११) एकाच दिवसात १,००१ नागरिकांना लसीकरण केल्याचा दावा करण्यात आला असून, त्यानंतर त्याचा आनंद व्यक्त करताना वैद्यकीय कर्मचारी व कार्यकर्ते.