दाभाडीत कोव्हॅक्सिनचा लसीचा दुसरा डोस उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:14 AM2021-05-14T04:14:48+5:302021-05-14T04:14:48+5:30
कोरोना आजारापासून बचावासाठी शासनातर्फे कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड अशा दोन्ही लसी देण्यात येत होत्या. याच आधारावर काही ठिकाणी कोव्हॅक्सिन तर ...
कोरोना आजारापासून बचावासाठी शासनातर्फे कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड अशा दोन्ही लसी देण्यात येत होत्या. याच आधारावर काही ठिकाणी कोव्हॅक्सिन तर काही ठिकाणी कोविशिल्ड लस देण्यात आली होती. मागील ५० दिवसांपूर्वी दाभाडी ग्रामीण रुग्णालयात २२ मार्च ते ५ एप्रिल या कालावधीत ५७० वृद्ध व फ्रंटलाइन वर्कर यांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस देण्यात आला होता. मात्र, त्यानंतर ही लस बंद झाल्याने संपूर्ण तालुक्यात केवळ कोविशिल्ड लस उपलब्ध होती. यामुळे ४२ दिवस पूर्ण झालेल्या या लोकांना लस उपलब्ध नसल्याने दुसऱ्या डोससाठी धावाधाव करावी लागत होती. ही लस मिळावी म्हणून अनेक नागरिक नामपूर, सटाणा, चांदवड या ठिकाणी जाऊन घेण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, सर्वसामान्य नागरिकांना हे शक्य नसल्याने सदरची बाब शासन दरबारी व्यक्त व्हावी याची प्रशासनाकडून दखल घेण्यात यावी यासाठी लोकमतने बातमी प्रसिद्ध केली होती. त्याची दखल घेत तात्काळ प्रशासनाकडून लस उपलब्ध करून देत दाभाडीत गुरुवारी कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस देण्यात आला.