आरोग्य विद्यापीठाला लाभल्या दुसऱ्या महिला कुलगुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:11 AM2021-07-08T04:11:48+5:302021-07-08T04:11:48+5:30
कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी कुलगुरूंची नियुक्ती करण्यात आली. डॉ. माधुरी कानिटकर या ...
कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी कुलगुरूंची नियुक्ती करण्यात आली. डॉ. माधुरी कानिटकर या प्रथमपासूनच या पदासाठी दावेदार मानल्या जात होत्या. मंगळवारी अपेक्षितपणे राज्यपालांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. त्यांच्या नियुक्तीमुळे विद्यापीठाला दुसऱ्यांना महिला कुलगुरू लाभल्या आहेत. २००५ ते २००९ या कालावधीत डॉ. मृदुला फडके विद्यापीठाच्या कुलगुरू होत्या. त्यांच्या निवृत्तीनंतर डॉ. नीलिमा क्षीरसागर यांच्याकडे प्रभारी कुलगुरूपदाचा कार्यभार सोपविण्यात आला होता. तत्कालीन केईएमच्या डीन असलेल्या डॉ. क्षीरसागर या फडके यांच्या भगिनी आहेत. त्यांनी सहा महिने प्रभारी कुलगुरू म्हणून कामकाज पाहिले होते. त्यानंतर आता कानिटकर या महिला कुलगुरू लाभल्या आहेत.
मृदुला फडके यांच्या कार्यकाळातच आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे २००८ मध्ये कानिटकर यांना सर्वोत्तम शिक्षक म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. दरम्यान, कानिटकर यांच्यासह विद्यापीठाला आजवर सहा पूर्णवेळ कुलगुरू लाभले असून, चार जणांनी प्रभारी कुलगुरू म्हणून पदभार सांभाळला आहे.
--इन्फो--
आरोग्य विद्यापीठाचे कुलगुरू
१) प्रा.डॉ. दयानंद डोणगावकर (१०/०७/१९९८)
२) प्रा.डॉ. रवी बापट (१०/०७/२००३)
३) प्रा. वैद्य व्ही.व्ही. उपासनी (प्रभारी) (०१/०१/२००५)
४) प्रा. डॉ. मृदुला फडके (११/०४/२००५)
५) प्रा. डॉ. नीलिमा क्षीरसागर (प्रभारी) २२/१२/२००९)
६) प्रा. डॉ. आर. कृष्णकुमार (प्रभारी) (०१/०७/२०१०)
७) प्रा. डॉ. अरुण जामकर (२१/१२/२०१०)
८) एकनाथ डवले, विभागीय आयुक्त (प्रभारी) २१/१२/२०१५
९) प्रा. डॉ. दिलीप म्हैसेकर (११/०२/२०१६)
१०) प्रा. डॉ. माधुरी कानिटकर