पाचशेच्या नोटांचा दुसरा लॉट रवाना

By admin | Published: November 15, 2016 02:58 AM2016-11-15T02:58:05+5:302016-11-15T03:07:12+5:30

पाचशेच्या नोटांचा दुसरा लॉट रवाना

The second lot of five hundred notes goes off | पाचशेच्या नोटांचा दुसरा लॉट रवाना

पाचशेच्या नोटांचा दुसरा लॉट रवाना

Next

 नाशिकरोड : चलार्थ पत्र मुद्रणालयात छापण्यात आलेल्या नवीन पाचशे रुपयांच्या पाच मिलियन नोटा सोमवारी रिझर्व्ह बॅँकेकडे रवाना करण्यात आल्या. श्री गुरू नानक जयंतीची शासकीय सुटी असतानादेखील मुद्रणालयात काम सुरू होते.
केंद्र शासनाने सात दिवसांपूर्वी चलनातून पाचशे व एक हजाराच्या नोटा रद्दबातल ठरविल्या. त्यानंतर बाजारात व दैनंदिन व्यवहारात इतर चलनांचा चांगलाच तुटवडा निर्माण झाला आहे. चलार्थ पत्र मुद्रणालयात नवीन पाचशेच्या नोटा छपाईचे काम सुरू असून, गेल्या शुक्रवारी ५ मिलियन (५० लाख) नोटा रिझर्व्ह बॅँकेकडे पाठविण्यात आल्या होत्या. त्यानंतर सोमवारी पुन्हा पाच मिलियन नोटा मुद्रणालयातून मुंबईला रिझर्व्ह बॅँकेकडे पाठविण्यात आल्या आहेत. मुद्रणालयात २०, ५००, १०० रुपये दराच्यादेखील नोटा छापण्यात येत आहेत. सोमवारी श्री गुरू नानक जयंतीची शासकीय सुटी असताना मुद्रणालयात काम सुरू होते. बाजारात निर्माण झालेला चलनाचा तुटवडा दूर करण्यासाठी मुद्रणालयात चलन छपाईचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

Web Title: The second lot of five hundred notes goes off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.