आज भरणार दुसऱ्या टप्प्यातील अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 12:58 AM2018-06-11T00:58:49+5:302018-06-11T00:58:49+5:30
नाशिक : राज्यातील प्रमुख शहरांत अकरावीची आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविली जात असून, दहावीचा आॅनलाइन निकाल जाहीर झाल्यानंतर आता प्रवेशप्रक्रि येचा दुसरा टप्पा (भाग दोन) भरण्यासह अकरावीच्या जागांचे वाटप व प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक सोमवारी (दि.११) जाहीर होण्याची शक्यता आहे.
नाशिक : राज्यातील प्रमुख शहरांत अकरावीची आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविली जात असून, दहावीचा आॅनलाइन निकाल जाहीर झाल्यानंतर आता प्रवेशप्रक्रि येचा दुसरा टप्पा (भाग दोन) भरण्यासह अकरावीच्या जागांचे वाटप व प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक सोमवारी (दि.११) जाहीर होण्याची शक्यता आहे.
दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी आॅनलाइन अर्जाचा भाग एक व भाग दोन भरणे अनिवार्य असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी या दोन्ही प्रक्रिया पूर्ण केल्या नाहीत, त्यांना या प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही. तसेच यंदा विद्यार्थ्यांना एका विद्याशाखेसाठी दहा महाविद्यालयांचा पसंतीक्रम नोंदविता येईल, तर त्या फेरीत प्रवेश न मिळाल्यास दुसºया फेरीसाठी विद्यार्थ्यांना विद्याशाखा बदलण्याची संधी असेल. तसेच महाविद्यालयांचा पसंतीक्रमही बदलता येऊ शकणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ही प्रवेशप्रक्रिया फायदेशीर असून, विद्यार्थ्यांनी आॅनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. नाशिक शहरात अकरावीच्या विज्ञान, वाणिज्य, कला व संयुक्त शाखा यांची ५७ कनिष्ठ महाविद्यालये असून, त्यात प्रवेशाच्या २७ हजार ९० जागा उपलब्ध असून, या जागांवर प्रवेशासाठी आतापर्यंत २१ हजार ७२४ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी भाग एक भरला आहे, त्यांना सोमवारी (दि.११) भाग दोन भरण्याचे वेळापत्रक नियोजन जाहीर झाल्यानंतर आपल्या आवडीच्या शाखेचा पर्याय, महाविद्यालयांचा पसंतीक्र म नोंदवावा लागणार आहे. त्यानंतर गुणवत्तेनुसार प्रवेशप्रक्रियेसाठी पहिली गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार असून, विद्यार्थ्यांना वेळापत्रकानुसार प्रवेशप्र्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
१५ हजार अर्जांची पडताळणी
शहरातील अकरावी प्रवेशासाठी पहिल्या भागात आतापर्यंत प्राप्त २१ हजार ७२४ विद्यार्थ्यांची नोंदणीप्रक्रिया पूर्ण झाली असून, त्यातील १५ हजार ७३६ अर्जांची पडताळणी मुख्याध्यापकांकडून करण्यात आली आहे. आॅनलाइन अर्जाचा भाग-१ भरताना विद्यार्थ्यांनी आपली वैयक्तिक माहिती सादर केली असून, विद्यार्थ्यांनी आपला यूजर आयडी व पासवर्डच्या माध्यमातून भाग दोन भरताना आवडीच्या विद्याशाखा व पसंतीक्र मानुसार किमान एक तर जास्तीत जास्त दहा महाविद्यालयांची निवड करण्याची संधी असेल. पहिल्या गुणवत्ता यादीनंतर प्रत्यक्ष प्रवेशप्रक्रि या राबविली जाणार असून, पहिल्या यादीनंतर विद्यार्थ्यांना दुसºया फेरीसाठी विद्याशाखा तसेच कॉलेजेसचा क्रमही बदलता येणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.