डांगसौंदाणे ग्रामपंचायतीला निर्मलग्रामचे द्वितीय पारितोषिक
By Admin | Published: July 17, 2016 01:01 AM2016-07-17T01:01:17+5:302016-07-17T01:02:03+5:30
स्वच्छ भारत अभियान : जिल्ह्यात राबविला उपक्रम
डांगसौंदाणे : स्वच्छ भारत अभियानांतर्गत राज्य शासनाचा दुसऱ्या क्रमांकाचा निर्मलग्राम पुरस्कार डांगसौंदाणे ग्रामपंचायतीला मिळाला आहे.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबविलेल्या निर्मलग्राम पुरस्काराचे द्वितीय पारितोषिक डांगसौंदाणे ग्रामपंचायतीला मिळाले असून, नाशिक येथे पालकमंत्री गिरीश महाजन, राज्यमंत्री दादा भुसे, जि.प अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन यावेळी ग्रामपंचायत सदस्यांना सन्मानित करण्यात आले.
संपूर्ण गाव हागणदारी मुक्त करून तसेच गावातील घनकचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. गावातील समस्यांचे योग्य पद्धतीने निराकरण करून ग्रामपंचायतीमार्फत ग्रामस्थांचे प्रश्न सोडविण्यावर भर देण्यात आला. यासाठी सरपंच नर्मदाबाई सोनवणे, उपसरपंच प्रफुल्लता सोनवणे, सदस्य डॉ. सुधीर सोनवणे, अनंत वाघ, अशोक गांगुर्डे, गुलाब सोनवणे, कासूबाई सोनवणे, पमा सोनवणे, जिजाबाई सोनवणे, ग्रामसेवक संदीप भामरे यांनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)