दुस-या श्रावण सोमवारसाठी प्रशासन सज्ज !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 03:16 PM2018-08-17T15:16:58+5:302018-08-17T15:17:29+5:30
त्र्यंबकेश्वर : बारा ज्योर्तिलिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची नेहमीच गर्दी होत असते. त्यातही श्रावणमास सुरु झाला की, प्रत्येक सोमवारी गर्दी होते. दि. २० रोजी येणाऱ्या दुसºया श्रावणी सोमवारसाठी प्रशासनतार्फे जय्यत तयारी करण्यात येत आहे.
त्र्यंबकेश्वर : बारा ज्योर्तिलिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची नेहमीच गर्दी होत असते. त्यातही श्रावणमास सुरु झाला की, प्रत्येक सोमवारी गर्दी होते. दि. २० रोजी येणाऱ्या दुस-या श्रावणी सोमवारसाठी प्रशासनतार्फे जय्यत तयारी करण्यात येत आहे. यासाठी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट व नगरपरिषद, नाशिक ग्रामीण पोलीस परिवहन महामंडळ, आरोग्य सेवा आदी यंत्रणांच्या जिल्हा प्रशासनाला अगोदरच नियोजन करावे लागते. दि.१३ ला पहिला सोमवार पार पडला. आता दि. २० ला दुसरा सोमवार आहे. त्यासाठी सर्व प्रशासनाने तयारी पुर्ण केली आहे. येणारा दुसरा श्रावणी सोमवार पहिल्या श्रावण सोमवारपेक्षा व येणा-या तिसरा सोमवार पेक्षा काहीसा कमी भरण्याची शक्यता आहे. तथापि गर्दी जास्त होईल असे गृहीत धरु नच प्रशासनाने येथील होणा-या गर्दीचे नियोजन केले आहे. त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या काही विश्वस्तांशी चर्चा केली असतांना कदाचित राहिलेल्या उणीवा उदा. भाविकांना दर्शन अधिक सुलभतेने व अधिक लवकर होणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे विश्वस्त मंडळाला सहकार्य करण्याची अपेक्षा आहे. देवस्थानच्या कर्मचा-यांना भाविकांशी वाद न घालता आपल्या सुचना सांगाव्यात असे सांगण्यात आले आहे. नगरपालिका आपापली कामे अधिक चांगली करण्याचा प्रयत्न करत आहे. खरी कसोटी तिस-या सोमवारला लागणार आहे. या वेळेस पोलीस प्रशासन, परिवहन महामंडळ या यंत्रणांवर वरिष्ठ अधिकारी लक्ष ठेउन असणार आहे. वेळेप्रमाणे नियोजन करण्यात येईल. तथापि दुस-या श्रावणसाठी प्रत्येक यंत्रणा सज्ज झाले आहेत. सोमवारपेक्षा शनिवार, रविवार अधिक गर्दी होत असल्याने शनिवारपासुनच सर्वांना कामाला लागावे लागणार आहे. कारण रविवारी ब्रम्हगिरी प्रदक्षिणेला जाऊन सोमवारचे त्र्यंबकेश्वर दर्शन घेउन भाविक आपापल्या घरी जातात.