मतदार पडताळणीसाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 12:23 AM2020-02-15T00:23:48+5:302020-02-15T00:24:55+5:30

अचूक आणि निर्दोष मतदारयादी तयार करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या मतदार पडताळणी मोहिमेंतर्गत नाशिक जिल्ह्यातील १५ मतदारसंघांत सुरू करण्यात आलेल्या मोहिमेला दोनदा मुदतवाढ देण्याची वेळ आली. निर्धारित वेळेत पडताळणीच्या कामाला अपेक्षित गती प्राप्त झाली नसल्याने आता पुन्हा २९ तारखेपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

Second term extension for voter verification | मतदार पडताळणीसाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ

मतदार पडताळणीसाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ

Next
ठळक मुद्दे९५ टक्केकाम : नाशिक मध्य मतदारसंघात बीएलओ पोहोचले घरोघरी

नाशिक : अचूक आणि निर्दोष मतदारयादी तयार करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या मतदार पडताळणी मोहिमेंतर्गत नाशिक जिल्ह्यातील १५ मतदारसंघांत सुरू करण्यात आलेल्या मोहिमेला दोनदा मुदतवाढ देण्याची वेळ आली. निर्धारित वेळेत पडताळणीच्या कामाला अपेक्षित गती प्राप्त झाली नसल्याने आता पुन्हा २९ तारखेपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
गेल्या ११ नोव्हेंबरपासून जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदार पडताळणी मोहीम राबविण्यास सुरुवात झाली. त्यावेळी ३१ डिसेंबर २०१९ पर्यंतची मुदत मतदार पडताळणी कर्मचाऱ्यांना देण्यात आलेली होती, परंतु अत्यंत संथ काम झाल्याने १३ फेब्रुवारीपर्यंतची मुदत वाढवून देण्यात आली, मात्र निवडणूक शाखेने कठोर भूमिका घेत कामकाजात सुधारणा झाली नाही तर गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिलेला होता. त्यानंतर कामकाजाला काहीशी गती आली त्यामुळे १३ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यात सरासरी ९५.४१ टक्के काम पूर्ण झाले आहे.
पडताळणीची टक्केवारी वाढली असली तरी बीएलओ कर्मचाºयांना कामकाज सुधारण्याची संधी देऊनही अपेक्षित कामकाज झाले नसल्यामुळे पुन्हा एकदा मुदतवाढ देण्याची वेळ मुख्य निवडणूक अधिकाºयांवर आली. ज्या मतदारसंघात कमी पडताळणीचे काम झाले आहे. तेथे कामकाज वाढले असले तरी अपेक्षित टक्केवारी झालेली नाही. त्यामुळे एकाही विधानसभा मतदारसंघामध्ये १०० टक्के पडताळणी पूर्ण होऊ शकलेली नाही. ४५ लाख ६२ हजार ४४२ मतदारांपैकी ४३ लाख ५३ हजार ८१ मतदारांची पडताळणी पूर्ण झाल्याची माहिती निवडणूक शाखेचे तहसीलदार प्रशांत पाटील यांनी दिली. या मोहिमेला आता २९ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील पाच मतदारसंघ दोन दिवसांपूर्वी रेडझोनमध्ये होते ते त्यातून बाहेर आले आहे. प्रत्येक मतदारसंघामध्ये ९१ टक्क्यांच्या पुढे कामकाज झालेले दिसून
आले.
मालेगावसारख्या मतदारसंघात मतदार पडताळणी करवून घेण्यासाठी पुढे येत नसल्याने निर्माण झालेल्या अडचणींवर मात करून मतदारांपर्यंत कर्मचारी पोहोचल्याचा दावा जिल्हा निवडणूक शाखेने केला
आहे.
जिल्ह्यातील कामगिरी समाधानकारक असली तरी आलेल्या आदेशाप्रमाणे २९ तारखेपर्यंत सदर मोहीम सुरूच राहणार असल्याचे निवडणूक अधिकाºयांनी सांगितले.
मतदारसंघनिहाय टक्केवारी
नाशिक मध्य ९९.०३
चांदवड ९८.५३
निफाड ९८.४२
दिंडोरी ९७.०२
नाशिक पूर्व ९६.२३
मालेगाव बाह्य ९५.९४
नांदगाव ९५.८७
कळवण ९५.४७
इगतपुरी ९५.४४
सिन्नर ९४.७८
देवळाली ९४.६५
येवला ९३.९९
बागलाण ९३.२७
मालेगाव मध्य ९२.४५
नाशिक पश्चिम ९१.३५
एकूण : ९५.४१

Web Title: Second term extension for voter verification

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.