इगतपुरी तालुक्याला दुसऱ्यांदा उपाध्यक्षपद
By admin | Published: March 22, 2017 12:36 AM2017-03-22T00:36:00+5:302017-03-22T00:36:14+5:30
इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हे गटातून निवडून आलेल्या काँग्रेसच्या नयना गावित यांना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होण्याचा मान मिळाला आहे.
सुनील शिंदे : घोटी
इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हे गटातून निवडून आलेल्या काँग्रेसच्या नयना गावित यांना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होण्याचा मान मिळाला असून, त्यांच्या रूपाने याच गटाला तसेच तालुक्याला दुसऱ्यांदा उपाध्यक्ष होण्याची संधी प्राप्त झाली आहे.
राजकीय वारसा लाभलेल्या नयना गावित या माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावित यांच्या नात, तर इगतपुरी - त्र्यंबकेश्वर मतदारसंघाच्या आमदार निर्मला गावित यांच्या कन्या आहेत. सन १९८६ साली जन्म झालेल्या नयना गावित या उच्च शिक्षित असून, वाणिज्य शाखेच्या पदवीधर आहेत. राजकीय वारसा जरी लाभला असला तरी राजकारणाचा फारसा इंट्रेस नसलेल्या नयना गावित यांना वाडीवऱ्हे गटातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उमेदवारी करण्याची गळ घातली होती. आमदार निर्मला गावित व गावित परिवाराची इच्छा नसतानाही केवळ जनतेच्या आग्रहास्तव या गटातून काँग्रेसकडून उमेदवारी करून नयना गावित या निवडून आल्या होत्या. पुढे मात्र राजकीय समीकरणे बदलत त्यांना थेट उपाध्यक्ष होण्याचा मान मिळाला आहे. यापूर्वी वाडीवऱ्हे गटातून सन २००४ साली काँग्रेसकडूनच निवडून आलेल्या इंदुमती गुळवे यांना उपाध्यक्ष पदाची संधी मिळाली होती. तालुक्याचे भूमिपुत्र आणि काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा समजले जाणारे लोकनेते स्व.गोपाळराव गुळवे यांनीही पळसे गटातून निवडणूक जिंकून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होण्याचा मान मिळविला होता, तर मागील पाच वर्षात राष्ट्रवादीच्या अलका जाधव यांना अर्थ व बांधकाम सभापती होण्याचा मान मिळाला होता. एकंदरीत नाशिक जिल्हा परिषदेत कोणत्याही पक्षाची सत्ता येवो इगतपुरी तालुक्याला झुकते माप मिळाले आहे. तालुक्याला दुसऱ्यांदा उपाध्यक्ष पदाची संधी मिळाल्याने तालुक्यातील जनतेत उत्साह जाणवत आहे.
येवल्याचा लाल दिवा हुकला
येवला : जिल्हा परिषद अध्यक्षपदाची येवल्याची संधी हुकल्याने संभाजीराजे पवार आणि नरेंद्र दराडे यांच्या समर्थकांत नाराजीचा सूर व्यक्त होत आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद इतरमागास वर्गाच्या महिलेसाठी राखीव झाल्यापासूनच शिवसेना नेते संभाजीराजे पवार यांच्या भावजय सविता बाळासाहेब पवार यांना नगरसूल गटातून, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे यांच्या धर्मपत्नी सुरेखा दराडे यांना राजापूर गटातून मतदारांनी विक्रमी मतांनी विजयी शिक्कामोर्तब झाले आणि आता लाल दिवा पुन्हा एकदा येवल्याच्या वाट्याला येईल अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पवार आणि दराडे दोन्ही गट जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीत जिल्ह्यात कशा प्रकारचे गटबंधन होते यावर नजर ठेवून सक्रि य हालचालीत सहभागी होते. जिल्ह्याच्या राजकारणावर या दोघांची पकड पाहता लाल दिवा पुन्हा येवल्याला येण्याचा आशावाद अनेकांना होता. यापूर्वी राष्ट्रवादीच्या झेंड्याखाली राधाकिसन सोनवणे आणि मायावती पगारे यांना लालिदवा मिळाला होता.
आता शिवसेनेच्या झेंड्याखाली पुन्हा लालिदवा डोकावत होता.शर्तीचे प्रयत्न झाल्याची माहिती मिळाली आहे.लालिदवा सेनेलाच मिळाला असला तरी सिन्नरला लालिदवा गेल्याने पवार-दराडे समर्थकांत नाराजीची भावना निर्माण झाली.पवार-दराडे यांनी एकित्रत एकाच्याच उमेदवारीबाबत रस घेतला असता तर कदचित पुन्हा लालिदव्याचा हक्क सांगतांना बळकटी आली असती.अशी चर्चा कार्यकर्त्यात आहे.प्रत्येकाची अतिमहत्वाकांक्षा मुळे येवल्याचा जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचा दावा अशक्त झाल्याची चर्चा आहे.(वार्ताहर)