नोव्हेंबरमध्ये कोरोनाची दुसरी लाट शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2020 10:21 PM2020-10-08T22:21:45+5:302020-10-09T01:24:24+5:30

नाशिक- सध्या शहरात कोरोना बाधीतांची संख्या साडे सहा हजारावरून साडे चार हजार झाली असून मृत्यूचे प्रमाण देशाच्या सरासरी पेक्षा कमी ...

A second wave of corona is possible in November | नोव्हेंबरमध्ये कोरोनाची दुसरी लाट शक्य

नोव्हेंबरमध्ये कोरोनाची दुसरी लाट शक्य

Next
ठळक मुद्देआयुक्त जाधव: महापालिकेकडून दहा हजार खाटांचे नियोजन

नाशिक- सध्या शहरात कोरोना बाधीतांची संख्या साडे सहा हजारावरून साडे चार हजार झाली असून मृत्यूचे प्रमाण देशाच्या सरासरी पेक्षा कमी आहे. मात्र, त्यामुळे गाफील राहून उपयोग नाही. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असून त्या अनुषंगाने जगभरात चिंता आहे. नाशिक महापालिकेने देखील यासंदर्भात नियोजन सुरू केले असून सुमारे
दहा हजार खाटा रूग्णांसाठी उपलब्ध होऊ शकतील अशी व्यवस्था करण्यात येत आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी गुरूवारी (दि.८) दिली.
नाशिकमधील ज्येष्ठ पत्रकारांशी वार्तालापाच्या वेळी त्यांनी ही माहिती दिली. नाशिक शहरात कोरोना बाधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली आणि ती एका शिखरावर पोहोचल्यानंतर आता ती कमी होत आहे. सुमारे साडे सहा हजार उपचाराधीन रूग्णांची संख्या आता अवघ्या साडे चार हजारावर आली आहे. दररोज रूग्ण आढळण्याचे आणि मृत्यूचे प्रमाण देखील कमी झाले आहे. देशात दर दहा
लक्ष लोकसंख्ये मागे चाचण्यांचे प्रमाण नाशिक महापलिकेने वाढवले तसेच त्यामुळे लवकर आढळणा-या रूग्णांवर वेळीच उपचार केल्याने रूग्ण संख्येत घट झाली आहे, त्याच प्रमाणे मृत्यूचे प्रमाण देखील कमी झाले आहे, अशी माहिती आयुक्त जाधव यांनी दिली. नाशिक शहरात रूजु झाल्यानंतर आपण आरोग्य व वैद्यकिय व्यवस्था बळकटीकरणावर भर दिला आहे. त्यामुळे महापालिकेबरोबरच
खासगी रूग्णालयात देखील बेडस आणि अन्य खाटांची संख्या वाढविण्यात आली आहे. आता व्हेंटीलेटर्सचे बेड देखील शिल्लक आहेत. तथापि, नागरीक देखील आता घरीच विलगीकरणात उपचार घेण्यावर भर दिला जात आहे. सुमारे ३३ ते ३५ टक्के नागरीक घरीच उपचार घेत आहेत.
नाशिक मध्ये कोरोनाची स्थिती आता नियंत्रणात आहे. मात्र, त्यामुळे गाफील राहुन चालणार नाही. नोव्हेंबर - डिसेंबर महिन्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्या दृष्टीने नियोजन करण्याचे काम सुरू आहे. बिटको रूग्णालयात खाटा वाढविण्याचे नियोजन आहे.
अन्य आणखी काही खाटा वाढवून संभाव्य रूग्ण वाढ लक्षात घेऊन दहा हजार खाटांची व्यवस्था करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे महापालिकेच्या वतीने सर्व सज्जता सुरू आहे, असेही जाधव यांनी सांगितले.

महापालिका सुरू करणार टेली कंसल्टींग
महापालिकेतील आपल्या कारकिर्दीत नवीन संकल्प म्हणून आरोग्य व्यवस्था सक्षम करतानाच टेली कंसल्टींग (व्हर्च्युअल) सुरू करण्याचा विचार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. सध्या अशाप्रकारे दुरध्वनीवरच चर्चा करून उपचार करण्याचा ट्रेंड सुरू आहे. त्या अनुषंगाने नाशिक महापालिकेच्या वतीनेही टेली कंन्सलटींग सुविधा देण्यात येणार आहे.

इंजेक्शन्सची माहितीही आता डॅशबोर्डवर
मनपाच्या संकेतस्थळावरील डॅश बोर्डवर कोरोना रूग्णालयातील खाटा आणि अन्य माहिती दिली जाते. आता मध्यंतरी चर्चेत आलेल्या रेमेडिसिवर इंजेक्शन्सच्या उपलब्ध साठ्याबाबत देखील डॅशबोर्डवर माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. औषधे अणि इंजेक्शन्सबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने पाच ठिकाणी इंजेक्शन्सची उपलब्धता करून देण्यात आली आहे. त्यामुळे
अडचण दुर झाली असली तरी साठा कुठे किती उपलब्ध आहे. याबाबत डॅशबोर्डवर माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

माझे कुटूंब प्रभावीपणे राबविणार
माझे कुटंूब मोहिमेच्या माध्यमातून घरोघर आरोग्य सर्वेक्षण करण्यात येत आहे. १५ सप्टेंबर पासून ते अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्वांचा सहभाग आवश्यक आहे. त्याच प्रमाणे सध्या राबविण्यात येणा-या अडचणी दूर करण्यात येणार योजनेत सहभागी कर्मचा-यांचे प्रशिक्षण घेण्यात येईल. शिक्षक संघटनांचा सुरूवातीला विरोध होता. मात्र नंतर त्यांना सामाजिक जबाबदारीची जाणिव करून दिल्याने ते देखील मोहिमेत सहभागी झाले आहेत. एनजीओंना देखील मोहिमेत सहभागी करून घेण्यात येणार आहे.

 

Web Title: A second wave of corona is possible in November

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.