सलग दुसऱ्या वर्षीही बोकटे येथील यात्रोत्सव रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:10 AM2021-05-03T04:10:36+5:302021-05-03T04:10:36+5:30
दरवर्षी चैत्रशुद्ध कालाष्टमीला बोकटे येथील श्री कालभैरवनाथांचा यात्रोत्सव होत असतो, तर यात्रोत्सवात नाशिक, नगर, औरंगाबाद या तीन जिल्ह्यांतील भाविकांची ...
दरवर्षी चैत्रशुद्ध कालाष्टमीला बोकटे येथील श्री कालभैरवनाथांचा यात्रोत्सव होत असतो, तर यात्रोत्सवात नाशिक, नगर, औरंगाबाद या तीन जिल्ह्यांतील भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होत असते. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ‘ब्रेक द चेन’अंतर्गत लागू असणाऱ्या संचारबंदीमध्ये देवस्थानेही कुलूपबंद झालेली असून, यात्रोत्सवांवरही बंदी आहे. ग्रामस्थांच्या वतीने देवस्थान पदाधिकाऱ्यांनी यात्रोत्सव रद्द केल्याचे जाहीर केले होते; तर जमावबंदी लागू असल्याने भाविकांनी दर्शनासाठी मंदिर परिसरात येण्यासही मज्जाव केला आहे, तर ७ मे पर्यंत मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
यात्रोत्सवानिमित्ताने भगवान श्री कालभैरवनाथ व माता जोगेश्वरी यांच्या मूर्तीचे विधिवत पूजन व धार्मिक पूजा-पाठ मोजक्या पुजाऱ्यांच्या उपस्थित होणार आहे. भाविकांनी मंदिर परिसरात दर्शनासाठी न येता घरीच थांबून प्रतिमा पूजन करावे, असे आवाहन सरपंच प्रताप दाभाडे यांनी केले आहे.