सलग दुसऱ्या वर्षी वारी हुकल्याची खंत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:12 AM2021-07-20T04:12:11+5:302021-07-20T04:12:11+5:30
तब्बल ३० वर्षां मागील काही वर्षांपासून नियमितपणे वारीत सहभाग होता, मात्र, मागील वर्षापासून खंड पडल्याची खंत आहे. वारी चुकण्याचे ...
तब्बल ३० वर्षां मागील काही वर्षांपासून नियमितपणे वारीत सहभाग होता, मात्र, मागील वर्षापासून खंड पडल्याची खंत आहे. वारी चुकण्याचे हे अखेरचे वर्ष ठरो हीच माउलीचरणी प्रार्थना आहे.
पुंडलीक थेटे, वारकरी
--------
नियमित वारी करणाऱ्यांना सलग दुसऱ्या वर्षी आषाढीची वारी चुकली आहे. त्यामुळे जीवाला चैन नाही. महामारीमुळे सर्वांचाच नाइलाज झाला आहे. त्यामुळे विठुनामाचा जप करत आषाढी साजरी करण्याची पुन्हा वेळ आली आहे.
हभप अण्णा महाराज हिसवळकर, वारकरी
-------
दरवर्षी नियमितपणे वारी करण्याची परंपरा यावर्षीदेखील हुकली आहे. तसेच एसटीतून पालखीसमवेत जाण्याचीही संधी लाभली नसल्याने माउलीचे दर्शनही होणार नसल्याची खंत आहे. त्यामुळे सर्व वारकरी भाविकांना घरीच हरिपाठ करत आषाढी साजरी करावी लागणार आहे.
शंकर कांडेकर, वारकरी
---------