छुप्या पद्धतीचे गावठी दारूचे अड्डे उध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 11:54 PM2019-08-31T23:54:27+5:302019-08-31T23:55:22+5:30

कळवण : ग्रामीण भागात छुप्या पद्धतीने अवैध दारु विक्र ी व गावठी दारूचे अड्डे चालवणाऱ्यांविरोधात कळवण पोलिसांनी ‘आॅपरेशन वॉश आउट’ सुरू केले असून या कारवाईचा भाग म्हणून पोलिस स्टेशन हद्दीतील नांदुरी, भूसणी, ककाने, खेडगाव, भेंडी, विसापूर शिवारातील गावठी दारु बनवणारा अड्डाच पोलिसांनी उध्वस्त केला.

The secret method is to destroy the canister of alcohol | छुप्या पद्धतीचे गावठी दारूचे अड्डे उध्वस्त

छुप्या पद्धतीचे गावठी दारूचे अड्डे उध्वस्त

Next
ठळक मुद्देकळवण : कळवण पोलीसांची दारु विरोधात धडक मोहीम ; विक्रेते भयभीत

कळवण : ग्रामीण भागात छुप्या पद्धतीने अवैध दारु विक्र ी व गावठी दारूचे अड्डे चालवणाऱ्यांविरोधात कळवण पोलिसांनी ‘आॅपरेशन वॉश आउट’ सुरू केले असून या कारवाईचा भाग म्हणून पोलिस स्टेशन हद्दीतील नांदुरी, भूसणी, ककाने, खेडगाव, भेंडी, विसापूर शिवारातील गावठी दारु बनवणारा अड्डाच पोलिसांनी उध्वस्त केला.
या धडक मोहीमेत गावठी हातभट्टीची दारु तयार करण्याचे साहित्य साधनासह १६४ लिटर गावठी दारु , १५ लिटर देशी दारु, ४७० लिटर रसायन असा एकूण ४५ हजार रु पयांचा माल जप्त करण्यात आला आहे. तर गावठी दारु तयार करण्याचे साहित्य साधन जागेवर नष्ट करण्यात आले.
गावठी दारु पुरवठा करणारे व बनविणारे यांच्या विरोधात धडक मोहीम सुरु करण्यात आल्याने अवैध दारु विक्र ी व गावठी दारु विक्र ेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
कळवणचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अविनाश गडाख, पोलीस हवालदार मधुकर तारु, संदीप कडाळे, भोये, घोडे, ढुमसे, बोरसे, सचिन बावा, सुरेश पवार, खैरनार, घरटे, सुनील जाधव यांनी सदर कारवाई केली.
सप्तशृंग गड, नांदूरी, शिरसमणी, नवीबेज परिसरातील अवैध दारु विक्रेते पोलिस यंत्रणेच्या रडारवर असून अवैधरित्या दारु विक्र ी करणाऱ्यांच्या विरोधात पालिसांनी मोहीम उघडली असल्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी सांगितले.
या माहिमेकरीता साध्या वेष्यात पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी खासगी वाहनाने धाड टाकत असल्याने दारू विक्र ेत्यांची दमछाक झाली आहे.

Web Title: The secret method is to destroy the canister of alcohol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.