जिल्ह्यात कलम १४४ लागू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:11 AM2021-06-03T04:11:58+5:302021-06-03T04:11:58+5:30
कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भावामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने गंभीर परिस्थिती निर्माण होऊ नये, याकरिता तत्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू करण्यात ...
कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भावामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने गंभीर परिस्थिती निर्माण होऊ नये, याकरिता तत्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील ग्रामीण भागात १५ जूनपर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता, कलम १४४ (१)(३) लागू करण्यात आले आहे. त्यानुसार नागरिकांना दुपारी ३ ते सकाळी ६ वाजेपर्यंत सार्वजनिक ठिकाणी फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. आवश्यक कामासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांनी ओळखपत्र व सबळ पुरावे सोबत ठेवावेत, असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी एका आदेशान्वये कळविले आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी म्हणून जिल्ह्यात निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या तरतुदीनुसार अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवा व आस्थापना वगळून इतर सर्व आस्थापना व सेवा ठरवून दिलेल्या वेळेतच सुरू राहतील. तसेच सर्व खाजगी व शासकीय आस्थापनांना सार्वजनिक, खाजगी बस वाहतूक, रिक्षा, चारचाकी व दुचाकी वाहने नागरिकांसाठी केवळ परवानगी दिलेल्या कामासाठी वापरता येणार आहेत.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी मांढरे यांनी या आदेशात नमूद केले आहे.