इंग्रजी शाळांमध्ये सुरक्षिततेची व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 12:34 AM2017-10-01T00:34:06+5:302017-10-01T00:34:13+5:30

दिल्लीतील एका शाळेत झालेल्या दुर्घटनेत एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाला आणि त्यामुळेच साºयाच शाळांमधील विशेषत: इंग्रजी माध्यमाच्या आणि इंटरनॅशल स्कूल म्हणवणाºया शाळांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. शाळा अशा प्रकारच्या कोणत्याही सुविधा देत नाही अशातला भाग नाही. उलट अनेक इंग्रजी शाळांमध्ये सीसीटीव्हीपासून अन्य अनेक प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत आहेत.

 Security arrangements in English schools | इंग्रजी शाळांमध्ये सुरक्षिततेची व्यवस्था

इंग्रजी शाळांमध्ये सुरक्षिततेची व्यवस्था

Next

लोकमत विशेष
नाशिक : दिल्लीतील एका शाळेत झालेल्या दुर्घटनेत एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाला आणि त्यामुळेच साºयाच शाळांमधील विशेषत: इंग्रजी माध्यमाच्या आणि इंटरनॅशल स्कूल म्हणवणाºया शाळांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. शाळा अशा प्रकारच्या कोणत्याही सुविधा देत नाही अशातला भाग नाही. उलट अनेक इंग्रजी शाळांमध्ये सीसीटीव्हीपासून अन्य अनेक प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत आहेत.  दिल्लीतील शाळेच्या निमित्ताने सुरू झालेल्या सुरक्षिततेचा विचार करता सर्वच शाळांमध्ये मुलांच्या सुरक्षिततेबाबत पालक चिंतित आहेत. काही शाळांमध्ये जाऊन पालकांनी मुलांच्या सुरक्षिततेविषयी काय उपाययोजना केल्या याची विचारणा करण्याचे धाडसही केले. तथापि, बहुतांशी शाळा आपल्या स्तरावर उपाययोजना करीत असतात. बहुतांशी शाळांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असून सुरक्षा कर्मचारी तैनात केले आहेत. बाह्य अभ्यागतांना शाळेत प्रवेश निषिध्द करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे पूर्वपरवानगीशिवाय कोणलाही बाहेर मुलांना नेऊ दिले जात नाही. रासबिहारी स्कूलने यासंदर्भात पालकांना पत्र देऊन शाळेत काय सुरक्षा व्यवस्था आहे, याची माहिती दिली आहे तर अनेक शाळांनी पालकांच्या बैठका घेऊन शाळेची सुरक्षाव्यवस्था किती काटेकोर आहे, याबाबत अवगत केले आहे.
ही आहे सुरक्षा व्यवस्था
बहुतांशी शाळांनी बसविले सीसीटीव्ही,  बहुतांशी शाळांची बससेवा, खासगी विद्यार्थी वाहतूक करणाºयांची ठेवली जाते माहिती
कर्मचाºयांच्या चरित्र दाखले आवश्यक, अनोळखी अभ्यागतांना प्रवेशबंदी,  पालकांची ओळख पटवूनच मुलांना सोडले जाते घरी,  मुलांच्या आरोग्य काळजीसाठी प्राथमिक उपचार कक्ष,  स्वच्छ आणि हायजेनिक स्वच्छतागृहे.
रासबिहारी स्कूलमध्ये मुलांच्या सुरक्षिततेसाठी अनेक उपाययोजना असून यासंदर्भात पालकांना पत्र पाठवून अवगत करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या कुटुंबातील सदस्याशिवाय अन्य व्यक्तीबरोबरच सोडले जात नाही. बससेवेत खास महिला सेवक नियुक्त करण्यात आले आहे. मुलांवर शारीरिक इजासारख्या कोणत्याही दंडात्मक शिक्षा करण्यास मनाई असून त्याचे परीक्षण केले जाते.
- श्रीरंग सारडा, विश्वस्त, रासबिहारी इंटरनॅशनल स्कूल
शाळांमध्ये सुरक्षितता राहावी यासाठी भौतिक सुरक्षिततेची साधने आवश्यक आहेत, त्यानुसार आम्ही कार्यवाही करतोच आहे, परंतु मानसिकता महत्त्वाची आहे. गेल्या वीस- पंचवीस वर्षांची शाळेला परंपरा आहे. त्यामुळे येथे काम करणाºया कर्मचाºयांना कुटुंबाचे स्वरूप प्राप्त झाले आहे आणि कुटुंबाचे काम म्हणून जेव्हा कोणीतरी व्यक्ती काम करते, तेव्हा ती चुकीचे काम करूच शकत नाही. आमच्या संस्थेत आया, वाहनचालक, सुरक्षा कर्मचारी अशी सर्व पदे थेट नियुक्त करण्यात आली आहेत. त्याचा लाभच होतो.
- रतन लथ, संचालक, फ्रावसी इंटरनॅशनल अकॅडमी
आम्ही कोणत्याही दुर्घटनेची वाट न बघता सुरुवातीपासूनच मुलांच्या सुरक्षिततेकडे लक्ष दिले आहे. विशेषत: सीसीटीव्ही कव्हरेज अशाप्रकारचे आहे की, एक इंचही जागा सुटलेली नाही. तक्रार कोणाकडे करायची आहे हे त्याला अवगत असल्याने प्रत्येक मजल्यासाठी नियुक्त प्राधिकृत अधिकाºयाकडे तो नोंद करू शकतो. मुलांना सोडण्यासाठी आणि घेण्यासाठी येणाºया प्रायव्हेट मोटारी या शाळेच्या आतील जागेतच आणल्या जातात आणि तेथून शाळेच्या देखरेखीखाली मुले रवाना होतात. - श्रीकांत शुल्क, अशोका स्कूल



 

Web Title:  Security arrangements in English schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.