पूर नियंत्रणासाठी सुरक्षा दलाचे जवान दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 09:30 PM2018-08-22T21:30:00+5:302018-08-22T21:30:29+5:30
सलग दोन दिवस सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीच्या पाण्यात वाढ झाली असून सायखेडा, चांदोरीसह गोदाकाठ भागातील गावांना पुराचा धोका संभवतो. त्यामुळे खबरदारी म्हणून राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या २२ जवानांची तुकडी चांदोरी येथे रात्री उशिरा दाखल झाली. नायब तहसीलदार संघमित्रा बाविस्कर यांनी पूर परिस्थितीविषयी माहिती दिली.
गंगापूर व दारणा धरणासह नांदूरमध्यमेश्वर धरणाला मिळणाऱ्या नद्यातील धरणे ९० टक्क्यांपेक्षा जास्त भरली आहेत. त्यातच हवामान खात्याने पुराचा तडाखा बसणाºया सायखेडा, चांदोरी येथे राष्ट्रीय आपत्ती सुरक्षा दलाचे जवान दाखल झाले आहेत. संभाव्य पूर परिस्थतीच्या पार्श्वभूमीवर ते आठ दिवस मुक्कामाला राहणार आहेत. उद्यापासून पूरपरिस्थितीत धोका निर्माण झाल्यास बचाव कसा करायचा, याचे प्रशिक्षण देणार आहेत.