बाजारसमितीतील गर्दी नियंत्रणासाठी सुरक्षारक्षक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:13 AM2021-03-22T04:13:58+5:302021-03-22T04:13:58+5:30
जिल्ह्यातून भाजीपाला खरेदी विक्रीसाठी येणाऱ्या व्यापारी व शेतकऱ्यांमुळे होणाऱ्या गर्दीच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्यानंतर बाजार समितीने खबरदारी म्हणून उपाययोजना ...
जिल्ह्यातून भाजीपाला खरेदी विक्रीसाठी येणाऱ्या व्यापारी व शेतकऱ्यांमुळे होणाऱ्या गर्दीच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्यानंतर बाजार समितीने खबरदारी म्हणून उपाययोजना हाती घेतल्या आहेत. सामाजिक अंतर, मास्क वापर व बाजार घटका व्यतिरिक्त अन्य नागरिकांना प्रवेश बंदी करण्यात येऊन कृषी उत्पन्न प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षक नेमल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती देवीदास पिंगळे यांनी दिली.
राज्यात कोरोना विषाणूंचा संसर्ग वाढल्याने रुग्णसंख्येत वाढ होत आहे. बाजार समितीत जिल्हाभरातून शेतकरी शेतमाल आणतात. शेतकरी, हमाल, मापारी वर्गाची गर्दी होत असल्याने फिजिकल डिस्टनसिंग पाळले जात नाही मास्क लावले जात नाही त्यामुळेे बाजार समितीत होणाऱ्या दैनंदिन गर्दीबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या होत्या त्यानंतर सभापती पिंगळे यांना गर्दी नियंत्रणासाठी योग्य कारवाई न केल्यास कोरोना जात नाही तोवर बाजार समिती बंद करावी लागेल असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला होता. खबरदारी म्हणून पिंगळे यांनी बाजार समिती प्रशासनाला सूचना देऊन बाजार समिती प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षक नेमत आवारात हमाल, शेतकरी, व्यापारी, मापारी यांना नो मास्क नो एण्ट्री हा नियम कडक केला. भाजीपाला व फळभाज्या घेऊन येणाऱ्या वाहनाबरोबर एक शेतकरी यावा. कोरोना नियमावली पालन करावे अशी माहिती ध्वनिक्षेपकाद्वारे देण्यात येत आहे असे पिंगळे यांनी सांगितले.