वेतन होत नसल्याने सुरक्षा कर्मचारी संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 11:27 PM2019-12-23T23:27:58+5:302019-12-23T23:30:05+5:30

गेल्या अकरा महिन्यांपासून कामगार व व्यवस्थापन मंडळ यांच्यातील अंतर्गत वादामुळे बंद असलेल्या वसाका कारखान्याची सुमारे चारशे कोटींची मालमत्ता सांभाळणाऱ्या पंधरा सुरक्षा कर्मचाऱ्यांना गेल्या सात महिन्यांपासून भाडेकरू संस्था धाराशिव कारखान्याच्या व्यवस्थपनेकडून वेतन मिळाले नसल्याने या कर्मचाºयांवर उपासमारीची वेळ आली आहे.

The security staff is upset because there is no pay | वेतन होत नसल्याने सुरक्षा कर्मचारी संतप्त

वेतन होत नसल्याने सुरक्षा कर्मचारी संतप्त

Next
ठळक मुद्देलोहोणेर : भाडेकरू संस्था धाराशिव व्यवस्थापनेविरुद्ध तक्रार

लोहोणेर : गेल्या अकरा महिन्यांपासून कामगार व व्यवस्थापन मंडळ यांच्यातील अंतर्गत वादामुळे बंद असलेल्या वसाका कारखान्याची
सुमारे चारशे कोटींची मालमत्ता सांभाळणाऱ्या पंधरा सुरक्षा कर्मचाऱ्यांना गेल्या सात महिन्यांपासून भाडेकरू संस्था धाराशिव कारखान्याच्या व्यवस्थपनेकडून वेतन मिळाले नसल्याने या कर्मचाºयांवर उपासमारीची वेळ आली आहे.
यासंदर्भात एमएससी बँक, कामगार आयुक्त, सहकार सचिव, प्रांताधिकारी, धाराशिव कारखाना व्यवस्थापन मंडळ यांना निवेदन
देऊनही दखल न घेतल्याने या कर्मचाºयांनी संताप व्यक्त केला आहे. वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना हा डीव्हीपी ग्रुपच्या धाराशिव कारखान्यास सुमारे २५ वर्षांसाठी भाड्याने दिला आहे. येथील कर्मचारी व कारखान्याची करोडो रु पयांची मालमत्ता बेवारस सोडण्यात आली आहे. सदरची मालमत्ता येथील सुरक्षा रक्षक कमी संख्या असतानाही डोळ्यात तेल घालून रात्र - दिवस सांभाळत आहेत.
भाडेकरू संस्थेने पाठ फिरवली. आता या कारखान्याची सर्वस्वी जबाबदारी एमएससी बँकेकडे आहे. मात्र बँकेच्या संबंधित अधिकारी वर्गाने या कारखान्याकडे व संबंधित कर्मचाºयांच्या मागण्यांकडे डोळेझाक केली आहे. यामुळे या कर्मचाºयांचे सुमारे सात महिन्यांचे पगार थकले असून, सदर कर्मचाºयांचे संसार उघड्यावर पडल्याने त्याच्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे.
या संदर्भात संबंधित सुरक्षा कर्मचाºयांनी एमएससी बँक, कामगार आयुक्त, सहकार सचिव, प्रांताधिकारी धाराशिव कारखाना व्यवस्थापन
मंडळ यांना निवेदन देऊन वेतनाची मागणी केली आहे. निवेदनावर शांताराम सूर्यवंशी, नंदलाल सोनवणे, सुनील गुंजाळ, शंकर पाटील, विनायक जाधव, मधुकर आहिरे, अण्णासाहेब कवडे, शांताराम पूरकर, देवीदास पवार, बापू आहेर, साहेबराव पाटील, नरेंद्र पवार, दिनेश ठाकरे, विशाल निकम, राहुल देवरे, गफूर तांबोळी आदींच्या स्वाक्षºया आहेत.
कामगार संघटना-व्यवस्थापन मंडळात वाद
भाडेकरू संस्थेने सन २०१८-१९ चा गळीत हंगाम सुरू केला, मात्र सदरचा हंगाम हा २२ जानेवारी रोजी कामगार संघटना व भाडेकरू संस्था व्यवस्थापन मंडळ यांच्या अंतर्गत वादामुळे बंद पडला. तेव्हापासून ते आतापर्यंत सुमारे बारा महिन्यांच्या कालावधीत सुमारे चारशे करोड रु पयांची ही मालमत्ता येथील सुरक्षा रक्षक इमाने इतबारे सांभाळत आहेत. संप काळात या कर्मचाºयांना साखर व मोलेसेस विकून काही प्रमाणात पगार देण्यात आला. मात्र गेल्या सात महिन्यांपासून या बंद असलेल्या कारखान्याकडे भाडेकरू संस्था अथवा मालकी हक्क असलेल्या एमएससी बँकेच्या प्रतिनिधींनी पाठ फिरवली आहे.

Web Title: The security staff is upset because there is no pay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.