‘वसाका’ची सुरक्षा रामभरोसे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 09:24 PM2020-07-17T21:24:31+5:302020-07-18T00:42:27+5:30

लोहोणेर : नाशिक जिल्ह्यातील कसमादे परिसरातील चार तालुक्यांचे विकासाचे मुख्य केंद्र असलेल्या वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना अर्थात ‘वसाका’ची सुरक्षा रामभरोसे असल्याचे चित्र निदर्शनास आले आहे. कारखान्याच्या संरक्षक भिंतींना अनेक ठिकाणी भगदाड पडले आहे, तर अनेक ठिकाणी भिंतच पडल्याने कारखान्यातील कोट्यवधींची मालमत्ता धोक्यात आली असून, येथील प्रशासनाने तत्काळ भिंतींची दुरुस्ती करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

The security of 'Vasaka' is assured | ‘वसाका’ची सुरक्षा रामभरोसे!

‘वसाका’ची सुरक्षा रामभरोसे!

Next

लोहोणेर : नाशिक जिल्ह्यातील कसमादे परिसरातील चार तालुक्यांचे विकासाचे मुख्य केंद्र असलेल्या वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना अर्थात ‘वसाका’ची सुरक्षा रामभरोसे असल्याचे चित्र निदर्शनास आले आहे. कारखान्याच्या संरक्षक भिंतींना अनेक ठिकाणी भगदाड पडले आहे, तर अनेक ठिकाणी भिंतच पडल्याने कारखान्यातील कोट्यवधींची मालमत्ता धोक्यात आली असून, येथील प्रशासनाने तत्काळ भिंतींची दुरुस्ती करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
‘वसाका’तील सुरक्षा कर्मचाऱ्यांना आठ महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याने ते पुरेशा संख्येने कामांवर येत नाहीत. २८ हजार सभासद असलेल्या व ३०० कोटींची स्थावर मालमत्ता असलेल्या वसाकाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सन २०१७-२०१८ मध्ये धाराशिव या उद्योग समूहाला महाराष्ट्र राज्य शिखर बॅँकेने स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मदतीने २५ वर्षांसाठी भाडे कराराने कारखाना चालावयास दिला. सन २०१७-२०१८ मध्ये कामगारांशी करार करण्यावरून वाद निर्माण झाले. त्यामुळे हंगाम संपण्यापूर्वीच कारखाना बंद पडला.
वसाका सुरू करण्याची मागणी
एकीकडे वसाकाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, एक नव्हे तर तबल पाच ते सहा ठिकाणी या भिंतीला भगदाड पडले आहे. सध्या बंदावस्थेत असतानाही वसाका सुरू करण्यासाठी कामगारांच्या वतीने शर्र्थीचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
धाराशिव कारखाना प्रशासनाने लवकर पुढाकार घेऊन कामगार संघटनेशी कामगार उपायुक्त यांच्यासमोर झालेल्या लेखी चर्चेनुसार त्वरित करार करून कारखाना सुरू करण्यासाठी पुढे यावे, अशी मागणी कामगार संघटनेकडून करण्यात येत असल्याची माहिती वसाका कामगार संघटनेचे अध्यक्ष अशोक देवरे, कार्याध्यक्ष कुबेर जाधव यांनी दिली आहे.
१ गतवर्षी धाराशिवच्या संचालक मंडळाने कारखाना सुरू न केल्याने कामगार, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला होता. अशा परिस्थितीत या वर्षी वसाका सुरू होईल या आशेवर शेतकरी, कामगार आस लावून बसले आहेत. वसाकाच्या स्थावर मालमत्तेच्या संरक्षणासाठी महाराष्ट्र शासनाने सहा महिन्यांपूर्वी अवसायकाची नेमणूक केलेली आहे. त्यांच्यावर वसाकाची यंत्रसामग्री सुरक्षित व ‘जैसै थे’ ठेवण्याची जबाबदारी असूनही मालमत्तेचे नुकसान होत आहे.
२ सुरक्षा रक्षकांची संख्या मर्यादित असल्या कारणाने व त्यांना वेळेवर वेतन मिळत नसल्याने ते कामांवर येत नाही. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे त्यांना २४ तास सगळीकडे लक्ष देता येत नसल्याने कारखाना कार्यस्थळावरील दक्षिण बाजूला असलेली दगडी संरक्षक भिंत जागोजागी पडली आहे.
३ लोखंडी गज व दगडाचा वापर करून बांधण्यात आलेली दगडी भिंत कशी पडली याबाबत शंका व चर्चांना उधाण आले आहे. सन २०११-२०१२मध्ये बांधलेल्या संरक्षक भिंतींसाठी सुमारे दीड ते दोन कोटी रु पये खर्च करण्यात आला होता. मात्र, आता या भिंतींची अवस्था पाहिल्यावर सभासद व कामगारांचा संताप अनावर होत आहे.
सहकार क्षेत्रातील संस्थांची आज केविलवाणी अवस्था झाली असून, वसाकाला ऊर्जितावस्था प्राप्त होणे गरजेचे आहे. संरक्षण भिंत पाच ते सहा ठिकाणी भगदाड पडले असून, या प्रकरणी अवसायकांनी लक्ष घालण्याची गरज आहे.
- प्रभाकर पाटील,
ऊस उत्पादक संघर्ष समिती, वसाका
वसाकाच्या भिंतीला भगदाड पडले असून, याप्रकरणी चौकशी करण्यात यावी. वसाका सुरू करण्यासाठी सर्वतोपरी एकत्रित प्रयत्न करण्यात यावेत.
- अशोक देवरे,
कामगार युनियन अध्यक्ष, वसाका
वसाकाच्या संरक्षण भिंतीची अवस्था बिकट आहे. सदरची भिंत पडली नसून पाडल्याचा संशय व्यक्त होत आहे. याबाबत योग्य ती चौकशी करण्यात यावी.
- कुबेर जाधव,
कार्याध्यक्ष वसाका युनियन
धाराशिवने भाडेतत्त्वावर चालविण्यासाठी घेतलेल्या वसाका कारखान्याच्या संरक्षण भिंतीला भगदाड पडले असून, सदर भगदाड त्वरित बुजविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
- अभिजित पाटील,
अध्यक्ष, धाराशिव युनिट

Web Title: The security of 'Vasaka' is assured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक