निºहाळे येथे लाभार्थ्यांना बाजरी पिकांचे बियाणे व औषधांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 05:44 PM2019-07-10T17:44:15+5:302019-07-10T17:44:30+5:30
निºहाळे : सिन्नर तालुक्यातील निºहाळे-फत्तेपूर येथे ‘उन्नत शेती- समृद्ध शेतकरी’ अभियानांतर्गत येथे लाभार्थ्यांना बाजरी पिकांचे महाबीज १००५ व जीवाणूवर्धक औषधांचे वितरण करण्यात आले.
निºहाळे : सिन्नर तालुक्यातील निºहाळे-फत्तेपूर येथे ‘उन्नत शेती- समृद्ध शेतकरी’ अभियानांतर्गत येथे लाभार्थ्यांना बाजरी पिकांचे महाबीज १००५ व जीवाणूवर्धक औषधांचे वितरण करण्यात आले.
सरपंच अण्णा काकड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कृषी अधिकारी विजय शेलार, राजेंद्र वाघ, शशी केकाणे, सुकदेव काकड, किरण काकड, गणेश यादव, शिवाजी शिंदे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी शेलार यांनी विम्याची अंतिम मुदत २४ जुलै असून प्रधानमंत्री पीकविमा योजना व हवामान आधारित फळ पीकविमा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी भाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. यावेळी सुभाष यादव, प्रकाश दराडे, शांताराम केकाणे, गोटीराम सांगळे, गणेश सांगळे, विष्णू सांगळे, संदीप देशमुख, अशोक यादव आदी उपस्थित होते.