पर्यावरण संवर्धनासाठी विद्यार्थी तयार करणार सीड बॉल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2020 04:41 PM2020-06-08T16:41:02+5:302020-06-08T16:42:50+5:30
विविध सामाजिक संस्थांच्या वतीने वृक्षारोपण आणि संवर्धनाचे कार्यक्रम राबविण्यात येणार असून शहरातील विविध शाळेच्या विद्यार्थ्यांकडून पारंपारिक पद्धतीने वृक्षारोपण न करता सीडबॉल तयार करून घेतले जात आहेत. विद्यार्थ्यांनी तयार केलेले हे सीडबॉल घराच्या आवारात तसेच त्र्यंबकेश्वर येथील आदिवासी भागातील डोंगर परिसरात रोपण केले जाणार आहेत .
नाशिक : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी विविध सामाजिक संस्थांच्या वतीने वृक्षारोपण आणि संवर्धनाचे कार्यक्रम राबविण्यात येणार असून शहरातील विविध शाळेच्या विद्यार्थ्यांकडून पारंपारिक पद्धतीने वृक्षारोपण न करता बीजगोळे अर्थात सीडबॉल तयार करून घेतले जात आहेत.
विद्यार्थ्यांनी तयार केलेले हे सीडबॉल घराच्या आवारात तसेच त्र्यंबकेश्वर येथील आदिवासी भागातील डोंगर परिसरात रोपण केले जाणार आहेत .गेल्या वर्षी एकशे सत्तर एकर जागेत सिडबॉल टाकण्यात आले होते. यंदा आदिवासी भागातील डोंगर परिसरात सिडबॉल टाकण्यात येणार आहेत. शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांसह वेगवेगळ्या सामाजिक संस्थांनीही सीड बॉल तयार करून या माध्यमातून बिजारोपण केले होते. नाशिकमधील सामाजिक संस्थांनी नेहमीच वृक्षारोपनात पुढाकार घेतला आहे. परंतु, या संस्थांना मोठ्या प्रमाणात सीड बॉल उपलब्ध करण्याच्या आव्हानाचा सामना करावा लागत असल्याने अशा संस्थांकडून विविध शाळांमधील विद्यार्थ्यांकडून पावसाळ्यापूर्वी अशाप्रकारे सीड बॉ़ल तयार करून घेत ते डोंगराळ परिसरात टाकण्यासाठी अभियान राबविले जाते. गेल्या काही वर्षाक या अभियानाला चांगले यश मिळत असून शहर परिसरातील डोंगराळ भागासह वन विभागाच्या राखवी क्षेत्रातही पुन्हा विविध प्रकारची वृक्षवल्ली बहरताना दिसून येत आहे.