लग्नात वाटली बियाण्यांची पाकिटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2019 01:30 PM2019-02-03T13:30:10+5:302019-02-03T13:30:52+5:30
घोटी : देशी बियाण्यांच्या संवर्धनातून शेतकº्यांची आत्मनिर्भरता व्हावी, देशी वाणांची जपणूक करून सेंद्रिय शेतीचे महत्व अधोरेखित व्हावे यासाठी लग्नसमारंभात ...
घोटी : देशी बियाण्यांच्या संवर्धनातून शेतकº्यांची आत्मनिर्भरता व्हावी, देशी वाणांची जपणूक करून सेंद्रिय शेतीचे महत्व अधोरेखित व्हावे यासाठी लग्नसमारंभात उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. देशी वाण असलेले गुलाबी मुळा, डांगर, खरबूज, चाकवत, कोथिंबीर आणि राजगिरा बियाण्यांचे वº्हाडी मंडळीला पाकीट देण्यात आले. बियाण्यांची लागवड, उत्पादन आणि संवर्धन करण्यासाठी झटणारे कृषी विभागाचे अधिकारी संजय पाटील यांच्या या उपक्र माचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
इगतपुरी तालुक्यात सेवा बजावलेले कृषी खात्याचे अधिकारी संजय पाटील यांचे चिरंजीव गौरांक याचा विवाह रामदास सराफ यांची कन्या प्रियंका हिच्यासोबत नुकताच संपन्न झाला. यावेळी देशी बियाण्यांची लागवड करण्यासाठी बियाण्यांचे पाकीट स्वागत करतांना अक्षदांसोबत देण्यात आले.
सगळीकडे विषमुक्त सकस भाजीपाला व अन्नधान्य नसल्यामुळे अनेकजण आजारांनी ग्रस्त आहेत. अति रसायनांसह कीटकनाशकांचा वापर, देशी बियाण्यांची कमतरता यामुळे विविध प्रकारचे आजार निर्माण होत आहेत. या पाशर््वभूमीवर लग्नात स्वागत करतांना देशी बियाणे वाटपाच्या उपक्र माद्वारे संवर्धनाचा संदेश देण्यात आला. देशी बियाण्याचे जतनातून मिळणाºया पोषक व सकस आहाराद्वारे शरीर निरोगी व सुदृढ ठेवण्यासाठी या उपक्र माची संकल्पना सुचली असे संजय पाटील यांनी सांगितले. भविष्यातील पुढील पिढी जपण्यासाठी या उपक्र माद्वारे हा अल्पसा प्रयत्न वºहाडी मंडळीला भावला. देशी बियाण्यांची बँक सांभाळणाºया कोंभाळणे ता. अकोले येथील राहीबाई पोपेरे, भिल्ली येथील रमेश साकरकर यांच्याकडून मागवलेल्या देशी बियाण्यांची पाकीटे लग्न समारंभात वितरित करण्यात आली.
प्रतिक्रि या
विविध प्रकारच्या विदेशी कंपन्याद्वारे खते, बियाणे, कीटकनाशके वापराबाबत प्रचार प्रसिध्दीस सर्वजण बळी पडत आहेत. भूमातेच्या संवर्धनासह समृध्दीसाठी कमीत कमी रसायनांचा, कीटकनाशकांचा वापर करून सेंद्रीय शेती समृध्द करण्यासाठी या उपक्र माची संकल्पना आहे.
- संजय पाटील, वर पिता, देशी बियाणे संवर्धक