चांदवड तालुक्यात बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:12 AM2021-05-24T04:12:55+5:302021-05-24T04:12:55+5:30
गावागावांत ट्रायकोडर्मा, रायझोबियम, अझोटोबैक्टर, पीएसबी या जैविक जीवाणू संवर्धकांची बीजप्रक्रिया करण्याबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर ...
गावागावांत ट्रायकोडर्मा, रायझोबियम, अझोटोबैक्टर, पीएसबी या जैविक जीवाणू संवर्धकांची बीजप्रक्रिया करण्याबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील सर्व गावांमध्ये दिनांक २४ व २५ मे रोजी जैविक बीजप्रक्रियेबाबत मोहीम राबविण्यात येत आहे. पेरणीपूर्वी बियाण्यांना जैविक बीजप्रक्रिया केल्याने रासायनिक खतांची बचत होते, पिकांना नत्न, स्फुरदची उपलब्धता होते. बियाणांची उगवणशक्ती वाढून बीजअंकुरण जास्त प्रमाणात होते, बियाण्यांवरील रोग पसरविणा-या बुरशीची वाढ होऊ न देता जमिनीतच रोगकारक बुरशीचा नायनाट होतो. पिकांची जमिनीतील अन्नद्रव्य खेचून घेण्याची क्षमता वाढते, झाडांची मुळे जोमाने वाढतात, पिकाच्या उत्पादनात वाढ होते, पर्यावरणास उपयुक्त असल्यामुळे जमिनीचे आरोग्य सुधारते. यासाठी सर्व शेतकरी बांधवांनी जैविक बीजप्रक्रिया करूनच पेरणी करण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.
---------------------------------------------------------
चांदवडला पाच दिवसांत ५० नवीन रुग्ण
चांदवड - चांदवड येथे गेल्या पाच दिवसांत ५० अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण चांदवड शहरातील विविध भागांतील असून अन्य तालुक्यांतील आडगाव, बहादुरी, भाटगाव, भोयेगाव, धोंडबा, धोंडगव्हाण, गोहरण, जोपुळ, काजीसांगवी, मेसनखेडे, परसुल, पुरी, राहुड, तिसगाव, उसवाड, वाद, वडनेरभैरव, गणूर, मंगरूळ, पिंपळद, शेलू, भयाळे, मालसाणो, निमोण या गावांतील असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पंकज ठाकरे व तहसीलदार प्रदीप पाटील यांनी दिली आहे.
-------------------------------------------
निधन वार्ता
इंदुबाई सोनवणे
चांदवड : इंदुबाई नारायण सोनवणे (७५, रा. पिंपळगाव बसवंत) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, तीन मुले, मुलगी, पुतणे, सुना व नातवंडे असा परिवार आहे. चांदवड येथील श्री नेमिनाथ जैन विद्यालयातील प्रयोगशाळा परिचारक कैलास सोनवणे यांच्या त्या काकू होत.
फोटो - २३ इंदुबाई सोनवणे
===Photopath===
230521\23nsk_16_23052021_13.jpg
===Caption===
फोटो - २३ इंदुबाई सोनवण