कुणबी नोंदी शोधण्यासाठी पुराहित संघ, भाषा तज्ज्ञांची मदत घ्या

By संजय पाठक | Published: December 2, 2023 04:44 PM2023-12-02T16:44:30+5:302023-12-02T16:45:19+5:30

न्या. संदीप शिंदे यांच्या नाशिकमध्ये सूचना,विभागातील कामकाजाचा घेतला आढावा.

Seek help from Purahita Sangh, language experts to find Kunbi records | कुणबी नोंदी शोधण्यासाठी पुराहित संघ, भाषा तज्ज्ञांची मदत घ्या

कुणबी नोंदी शोधण्यासाठी पुराहित संघ, भाषा तज्ज्ञांची मदत घ्या

संजय पाठक, नाशिक: कुणबी, कुणबी- मराठा, मराठा- कुणबी या जात नोंदणीबाबत
केवळ कागदपत्रांचीच छाननी न करता नाशिकमध्ये ज्या पध्दतीने पुरोहित
संघासारख्या संस्थांची मदत घेण्यात आली. त्याच धर्तीवर अन्यत्रही पुराेहित संघ आणि अन्य संस्थांची मदत घ्यावी. आणि येत्या ८ डिसेंबरपर्यंत नाशिक विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी आपला अहवाल पाठवावा असे आदेश न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांनी दिले आहेत.

कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना
देण्याबाबतची कार्यपद्धती निश्चीत करण्यासाठी समितीची बैठक समितीचे
अध्यक्ष न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक
येथील विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडली. यावेळी न्या. शिंदे यांनी हे
निर्देश दिले.

यावेळी नोंदी शोधण्यासाठी शासकीय विभागांनी तसेच इतर लिपीतील नोंदीबाबत
संबंधित भाषा जाणकारांची मदत घेण्यात यावी, अशा सूचना केल्या. विभागीय
आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी संपूर्ण विभागाची माहिती देताना तपासण्यात
आलेली कागदपत्रे व कुणबी, कुणबी-मराठा, मराठा कुणबीच्या आढळून आलेल्या
नोंदीबाबतची माहिती दिली.

Web Title: Seek help from Purahita Sangh, language experts to find Kunbi records

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक