भाजपातील गुन्हेगारीकरणावर शिक्कामोर्तब
By admin | Published: May 28, 2017 01:21 AM2017-05-28T01:21:19+5:302017-05-28T01:21:40+5:30
नाशिक : जालिंदर उगलमुगले याच्या खूनप्रकरणी भाजपा नगरसेवक हेमंत शेट्टी यास पोलिसांनी गजाआड केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : जालिंदर उगलमुगले याच्या अपहरण व खूनप्रकरणी संशयित म्हणून भाजपा नगरसेवक हेमंत शेट्टी यास पोलिसांनी गजाआड केल्यानंतर भाजपातील गुन्हेगारीकरणाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. महापालिका निवडणुकीपूर्वी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या गुंडांना पक्षात पावन करून घेण्यात आघाडीवर असलेल्या शहराध्यक्षांच्या कार्यपद्धतीवरच आता प्रश्नचिन्ह लावले जात असून, पक्षातून विरोधी सूर उमटण्यास सुरुवात झाली आहे.
महापालिका निवडणुकीपूर्वी सहा महिने अगोदर नाशिकरोड विभागातील दोन प्रभागांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाचे शहराध्यक्ष तथा विद्यमान आमदार बाळासाहेब सानप यांनी तत्कालीन अपक्ष नगरसेवक व गुन्हेगारी पार्श्वभूमी लाभलेल्या पवन पवार यास पक्षात पावन करून घेतले होते. शहराध्यक्षांच्या या कृतीविरुद्ध त्याचवेळी पक्षांतर्गत भडका उडाला होता. अन्य दोन आमदारांसह पदाधिकाऱ्यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली होती. भाजपाशी संबंधित संघपरिवारही नाराज झालेला होता. मात्र, सानप यांनी पोटनिवडणुकीत भाषण ठोकताना पवन पवार यांच्यामुळेच आपण आमदार म्हणून निवडून आल्याचे छातीठोकपणे सांगत एकप्रकारे गुन्हेगाराचेच समर्थन केले होते. पोटनिवडणुकीत दोन्ही जागा भाजपाच्या पदरात पडल्याने शहराध्यक्षांचा उत्साह आणखी दुणावला आणि पक्षात त्यांच्या एकाधिकारशाहीला बळ मिळत गेले. त्यामुळेच महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आणि पोलीस ठाण्यात गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेल्यांना पक्षाचे दरवाजे खुले करण्यात आले. त्यातूनच काही मर्जीतील उमेदवारांना शहराध्यक्षांनी तिकीट वाटप केले. त्यातील काही निवडूनही आले. पंचवटी विभागातून निवडून आलेल्या भाजपा नगरसेवक हेमंत शेट्टी यास आता पोलिसांनी खूून प्रकरणात गजाआड केल्याने भाजपातील गुन्हेगारीकरणाच्या चर्चेला पुन्हा एकदा