जलसंपदा विभागाच्या आगीबाबत अहवालाची मागणीछावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 16:15 IST2018-08-28T16:14:05+5:302018-08-28T16:15:26+5:30
कळवण- राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाच्या पुनंद प्रकल्प अंतर्गत पुनंद उजव्या व डाव्या कालव्याच्या उपविभागीय कार्यालयाला आग लागल्यामुळे शासनाच्या जलसंपदा विभागाचे व सिंचनाशी निगडीत अनेक प्रकल्पांचे महत्वाचे कागदपत्र जळून खाक झाली असून या प्रकल्प कार्यालय अंतर्गत काही कालव्यांच्या कामांची चौकशी सुरू असताना आग लागल्यामुळे महावितरणच्या अहवालाकडे लक्ष लागले आहे.

जलसंपदा विभागाच्या आगीबाबत अहवालाची मागणीछावा
क्र ांतिवीर सेना: महावितरणने निपक्षपातीपणे चौकशी करावी
कळवण-
राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाच्या पुनंद प्रकल्प अंतर्गत पुनंद उजव्या व डाव्या कालव्याच्या उपविभागीय कार्यालयाला आग लागल्यामुळे शासनाच्या जलसंपदा विभागाचे व सिंचनाशी निगडीत अनेक प्रकल्पांचे महत्वाचे कागदपत्र जळून खाक झाली असून या प्रकल्प कार्यालय अंतर्गत काही कालव्यांच्या कामांची चौकशी सुरू असताना आग लागल्यामुळे महावितरणच्या अहवालाकडे लक्ष लागले आहे.
या आगीबाबत महावितरणने निपक्षपातीपणे चौकशी करु न तत्काळ अहवाल द्यावा अशी मागणी छावा क्र ांतिवीर सेनेने केली आहे.
याबाबत महावितरणचे उपकार्यकारी अभियंता ऋषीकेश खैरनार यांची छावा क्र ांतिवीर सेनेचे तालुकाध्यक्ष प्रदीप पगार , तालुका उपाध्यक्ष देवा भुजाडे, शहर अध्यक्ष सागर पगार, युवा तालुका अध्यक्ष चेतन पगार, हर्षद पगार, गौतम पगार, योगेश पगार या शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन देत तत्काळ अहवाल देण्याची मागणी केली.दरम्यान गेल्या सप्ताहात २१आॅगस्ट रोजी विद्युत निरीक्षक यांनी या कार्यालयांची पहाणी केली असून महावितरणकडून अद्याप अहवाल प्राप्त न झाल्याने चर्चेला उधाण आले आहे.