उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी मागणी : सीमा हिरे यांनी केल्या विविध सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 01:11 AM2018-02-11T01:11:11+5:302018-02-11T01:12:09+5:30
सिडको : आमदार सीमा हिरे यांनी उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक खोडसकर हेदेखील उपस्थित होते.
सिडको : आमदार सीमा हिरे यांनी उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक खोडसकर हेदेखील उपस्थित होते. लेखानगर उड्डाणपूल वळण मार्ग तयार करणे, इंदिरानगर जंक्शन येथील चारही बाजूने सर्व्हीस रोड, इंदिरानगर-गोविंदनगर बोगद्याजवळील मुंबईकडून येणारा डाउन व मुंबईकडे जाणारा अप हे दोन्ही पर्याय पूर्णत: बंद करणे व याठिकाणी असलेला सर्व्हीस रोड मोठा करणे, तसेच हॉटेल सेव्हन हेव्हन येथे मुंबईकडे पुलावर जाण्यासाठी मार्ग अप तयार करणे, स्प्लेंडर हॉलजवळ सिडको-सातपूर अंबड भागात जाणाºया वाहनांना पुलावरून खाली उतरण्यासाठी नवीन मार्ग तयार करणे, एसबीआय चौक येथून धुळे व इतर ठिकाणी जाणाºया वाहनांना पुलावर जाण्यासाठी नवीन मार्ग तयार करणे तयार करणे, इंदिरानगर येथे सिग्नल यंत्रणा बसविणे आदी कामे करणेबाबत चर्चा करण्यात आली. यासंबंधी लेखी निवेदनाद्वारे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे मागणी केली होती. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून रुपये चार कोटी २० लाखांच्या कामांना मंजुरी देण्यात आली होती. ही कामे प्रगतिपथावर असून विल्होळी येथील सर्व्हीस रोडचे कामही प्रगतिपथावर आहे. या कामांची आमदार सीमा हिरे व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक खोडसकर यांनी पाहणी केली. यावेळी नगरसेवक सतीश सोनवणे, अॅड. श्याम बडोदे, शहर सुधार समिती अध्यक्ष भगवान दोंदे, नगरसेवक पुष्पा आव्हाड, भाग्यश्री ढोमसे, दीपाली कुलकर्णी, सुप्रिया खोडे यांच्यासह सचिन कुलकर्णी, सुनील खोडे, डॉ. वैभव महाले, मनोज बिरार, प्रकाश चकोर, शैलेश साळुंखे, कमलाकर गायकवाड, शोभाताई सोनवणे
उपस्थित होते.