साकूरच्या कुस्तीपटूंची जिल्हास्तरावर निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 11:53 PM2018-09-14T23:53:45+5:302018-09-15T00:20:10+5:30
इगतपुरी तालुक्यातील साकूर येथील नूतन माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी विराज गुंजाळ व सार्थक ढेरिंगे यांनी भगूर येथील बलकवडे व्यायामशाळेत झालेल्या जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावून देदीप्यमान कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले आहे. भगूर येथे पार पडलेल्या नाशिक जिल्हा शालेय कुस्ती स्पर्धेत हे यश संपादन केल्यामुळे साकूर परिसरातील नागरिकांच्या वतीने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील साकूर येथील नूतन माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी विराज गुंजाळ व सार्थक ढेरिंगे यांनी भगूर येथील बलकवडे व्यायामशाळेत झालेल्या जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावून देदीप्यमान कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले आहे. भगूर येथे पार पडलेल्या नाशिक जिल्हा शालेय कुस्ती स्पर्धेत हे यश संपादन केल्यामुळे साकूर परिसरातील नागरिकांच्या वतीने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
भगूर येथे झालेल्या नाशिक जिल्हा शालेय कुस्ती स्पर्धा बलकवडे व्यायामशाळा भगूर येथे पार पडल्या. यामध्ये १७ वर्ष वयोगटातील ५७ किलो वजनी गटात इगतपुरी तालुक्यातील साकूर येथील नूतन माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी विराज व सार्थक यांनी या दोघांनीही आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करून प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावत त्यांची नंदुरबार येथे होणाऱ्या विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली. यावेळी नाशिक जिल्हा कुस्ती संघाचे अध्यक्ष गोरखनाथ बलकवडे, शाळेचे क्रीडा-शिक्षक गोडसे, शाळेचे मुख्याध्यापक रोकडे, तसेच पालक-शिक्षक संघाचे पदाधिकारी संजय सहाणे, भारत सहाणे व परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.
जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी केल्याबद्दल विजेत्या कुस्तीपटूंचा नाशिक जिल्हा कुस्ती संघाचे अध्यक्ष गोरखनाथ बलकवडे यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.