विलगीकरण खरच हेातेय का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:14 AM2021-03-19T04:14:12+5:302021-03-19T04:14:12+5:30
नागरिकांनी जबाबदारी पार पाडावी विलगीकरणाचा उद्देश सफल होत नसल्याने संबंधित रुग्णांमुळे त्याच्याच घरातील इतर लोक बाधित होऊन इमारतीमध्ये ...
नागरिकांनी जबाबदारी पार पाडावी
विलगीकरणाचा उद्देश सफल होत नसल्याने संबंधित रुग्णांमुळे त्याच्याच घरातील इतर लोक बाधित होऊन इमारतीमध्ये राहणाऱ्यांनाही धोका निर्माण होणार असेल तर संबंधित नागरिकांनीच याबाबतची माहिती मनपाला दिली पाहिजे. त्यांचे नाव गोपनीय ठेवले जाईल. मनपा आयुक्तांनी माहिती देण्यासाठी हेल्पलाइन सुरू करावी, अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.
--इन्फो--
ॲन्टिजन टेस्ट वाढविणार!
शहरात ५८ हॉट स्पॉटस् असल्याने अशा ठिकाणी ॲन्टिजन टेस्ट वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. बाधित रुग्ण शोधण्यावर भर देऊन त्यांना उपचाराखाली आणण्यासाठी हॉटस्पॉटवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. ट्रेस, ट्रॅक आणि ट्रिट या त्रुसूत्रीचा वापर करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.
--इन्फो-
खासगी डॉक्टर, लॅबने माहिती पुरवावी
खासगी डॉक्टर्स जर काही संशयित अथवा कोरेाना रुग्णांवर उपचार करीत असतील तर त्यांनी त्याची माहिती संबंधित यंत्रणेला दिली पाहिजे, अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. त्याचप्रमाणे लॅबमध्ये आलेल्या रुग्णाबाबत शंका वाटल्यास त्याची माहितीदेखील संंबंधित लॅबने मनपाच्या आरेाग्य विभागाला दिली पाहिजे. जेणे करून लवकर उपचार सुरू करून त्यास क्वारंटाईन करता येईल. खासगी डॉक्टर्स, लॅब्सनेदेखील सहकार्य करणे अपेक्षित आहे.