पॅरोलवरील आरोपीकडून देशी बनावटीचा कट्टा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2021 01:33 AM2021-11-20T01:33:50+5:302021-11-20T01:34:41+5:30

खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेला व सध्या पॅरोलवर आलेला योगेश दादा गांगुर्डे (३०) याला गाडगे महाराज पुलाजवळीत त्याच्या राहत्या घरातून नाशिक शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकच्या पथकाने प्राणघातक देशी बनावटीच्या कट्ट्यासह ताब्यात घेतले आहेे.

Seizure of indigenous fabric from accused on parole | पॅरोलवरील आरोपीकडून देशी बनावटीचा कट्टा जप्त

पॅरोलवरील आरोपीकडून देशी बनावटीचा कट्टा जप्त

Next

नाशिक : खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेला व सध्या पॅरोलवर आलेला योगेश दादा गांगुर्डे (३०) याला गाडगे महाराज पुलाजवळीत त्याच्या राहत्या घरातून नाशिक शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकच्या पथकाने प्राणघातक देशी बनावटीच्या कट्ट्यासह ताब्यात घेतले आहेे.

पोलीस अंमलदार महेश साळुंके यांना योगेश गांगुर्डे देशी बनावटीच्या कट्ट्यासह वावरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यांनी ही खबर गुन्हेशाखा युनिट एकचे पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांना दिल्यानंतर युनिट एकच्या पथकाने मिळालेल्या माहितीप्रमाणे कारवाई करीत योगेश गांगुर्डे याला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याच्याकडून देशी बनावटीच्या ३१ हजार रुपये किमतीच्या कट्ट्यासह एक जिवंत काडतुसही जप्त केल्याची माहिती पोलिसानी दिली.

Web Title: Seizure of indigenous fabric from accused on parole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.