इगतपुरी तालुक्यातील ४० शाळांची ‘सेव्ह द चिल्ड्रन’ उपक्र मासाठी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2019 04:53 PM2019-12-07T16:53:19+5:302019-12-07T16:55:11+5:30

घोटी : शिक्षण विभाग पंचायत समिती इगतपुरी व ‘सेव्ह द चिल्ड्रन’ या स्वंयसेवी संस्थेच्या वतीने नाविण्यपूर्ण उपक्रमासाठी इगतपुरी तालुक्यातील विविध भागातील ४० शाळांची निवड करण्यात आली.

Selection of 7 schools in Igatpuri taluka for 'Save the Children' initiative | इगतपुरी तालुक्यातील ४० शाळांची ‘सेव्ह द चिल्ड्रन’ उपक्र मासाठी निवड

‘सेव्ह द चिल्ड्रन’ संस्थेच्या वतीने उपक्रमाच्या उदघाटनाप्रसंगी मार्गदर्शन करतांना डॉ. वैशाली वीर समवेत किरण जाधव, भारत वेंदे, प्रतिभा बरडे , शिवनाथ निर्मळ, निलेश पाटोळे आदी.

Next
ठळक मुद्देगुणवत्ता विकसनासाठी स्वयंसेवी संस्थाचा सहभाग शिक्षकांचे मनोबल वाढविणारा

लोकमत न्यूज नेटवर्क
घोटी : शिक्षण विभाग पंचायत समिती इगतपुरी व ‘सेव्ह द चिल्ड्रन’ या स्वंयसेवी संस्थेच्या वतीने नाविण्यपूर्ण उपक्रमासाठी इगतपुरी तालुक्यातील विविध भागातील ४० शाळांची निवड करण्यात आली.
गुणवत्ता विकसनासाठी स्वयंसेवी संस्थाचा सहभाग शिक्षकांचे मनोबल वाढविणारा ठरत आहे. गोरगरीबांच्या मुलांचे भविष्य ‘सेव्ह द चिल्ड्रन’ या उपक्रमातुन उजळू शकते. हा नाविण्यपूर्ण उपक्र म यशस्वी करण्यासाठी शिक्षक व समाजाने पुढाकार घ्यावा असे प्रतिपादन प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर-वीर यांनी केले.
या उपक्र माच्या उदघाटनाप्रसंगी डॉ वीर बोलत होत्या. यावेळी गटविकास अधिकारी किरण जाधव, सहायक गटविकास अधिकारी भरत वेंदे, गटशिक्षणाधिकारी प्रतिभा बरडे, शिवनाथ निर्मळ, जिल्हा परिषदेचे शिक्षण विस्तार अधिकारी निलेश पाटोळे, सुनिल दराडे, सेव्ह द चिल्ड्रन संस्थेच्या राज्य समन्वयक इप्सिता दास, प्रकल्प समन्वयक हरीश वैद्य, लबिना शहा, केंद्रप्रमुख पोपट महाजन, अकबर शेख, पंडीत धोंगडे, गोरखनाथ परदेशी, पोपट देवरे, विजय पगारे, राजेंद्र नांदुरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी प्रतिभा बरडे यांनी प्रास्ताविकात इगतपुरी तालुक्यातील विविध भौतिक सुधारणा, शैक्षणिक गुणवत्ता, तसेच राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्र मांची माहीती दिली. तालुक्यातील ४० शाळांची ‘सेव्ह द चिल्ड्रन’ या उपक्रमासाठी निवड केल्याबद्दल संस्थेचे शिक्षण विभागातर्फ कौतूक केले.


या शाळांची झाली निवड
बोरटेंभे, गिरणारे, त्रिंगलवाडी, बलायदुरी, घोटी मुले, मुली , नांदगाव सदो मुले,मुली, टाकेघोटी, काळुस्ते, तळोघ, रामरावनगर, माणकिखांब, देवळे, खैरगाव, अधरवड, बारशिंगवे, भंडारदरावाडी, साकुर, मुकणे, कुशेगाव, मोडाळे, सांजेगाव, कावनई, बेलगाव त-हाळे, भरवीरखुर्द, तळेगाव, आडवण, शेवगेडांग, टिटोली, सोमज, वाळविहीर, दौंडत, उभाडे, उंबरकोन, इंदोरे, भरवीर बुद्रुक, मोगरे, व मानवेढे या शाळांचा समावेश आहे.

 

Web Title: Selection of 7 schools in Igatpuri taluka for 'Save the Children' initiative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.