राज्य स्पर्धेसाठी अ‍ॅथलेटिक्स खेळाडूंची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 03:47 PM2019-02-26T15:47:46+5:302019-02-26T15:47:58+5:30

नाशिक : जिल्हा अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने नाशिकच्या विभागीय क्र ीडा संकुलात नुकत्याच नाशिक जिल्हा अजिंक्यपद अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत संपूर्ण जिल्ह्यातून ७३५ खेळाडूंनी सहभाग घेऊन प्रतिसाद दिला.

  The selection of athletics players for state competition | राज्य स्पर्धेसाठी अ‍ॅथलेटिक्स खेळाडूंची निवड

राज्य स्पर्धेसाठी अ‍ॅथलेटिक्स खेळाडूंची निवड

googlenewsNext
ठळक मुद्देया स्पर्धेत विविध प्रकारात पहिले तीन क्र मांक मिळविणाऱ्या खेळाडूंची नाशिक जिल्हा संघात निवड करण्यात आली असून, हे खेळाडू दि. २ आणि ३ मार्च रोजी डेरवण (जि. रत्नागिरी) येथे आयोजित महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधित्व



नाशिक : जिल्हा अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने नाशिकच्या विभागीय क्र ीडा संकुलात नुकत्याच नाशिक जिल्हा अजिंक्यपद अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत संपूर्ण जिल्ह्यातून ७३५ खेळाडूंनी सहभाग घेऊन प्रतिसाद दिला.
या स्पर्धेत सबज्युनिअर गटाचा ८ वर्षे मुले - मुली, १० वर्षे मुले-मुली आणि १२ वर्षे मुले-मुली अशा तीन वयोगटाच्या समावेश होता. या स्पर्धेत विविध प्रकारात पाहिले तीन क्र मांक मिळविणाऱ्या खेळाडूंना प्रमुख पाहुणे गंगाधर जाधव, जिल्हा क्र ीडा अधिकारी रवींद्र नाईक, राहुल देशमुख, हेमंत पांडे आदींच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.

स्पर्धेचा निकाल
१२वर्षे मुली - १००मिटर धावणे - स्मितल मोरे, - प्रथम, अपराजीता गायखे - दुसरा क्र मांक, वैष्णवी लोंढे- तिसरा .
३०० मीटर : स्मितल मोरे, अपराजिता गायखे, तेजल पाटील आणि भारती धुळे
लांब उडी - प्राची मोहिते, वैष्णवी लोंढे, भारती धुळे
गोळाफेक - श्रेयसी चिंतामणी, गिरिश्मा बोडके, हिमानी पटेल आणि मैत्रेई अहिरे.
१० वर्षे (मुली) २०० मीटर - दिशा निकम, ओवी निकम, दिशा देवगिरे
गोळाफेक- भूमी बढे, संस्कृती शेळके, राशी राऊत
चारबायतीन१०० रिले -जिल्हा परिषद शाळा, देवदारी ,आश्रमशाळा, बोपेगाव , ब्लोसं इंटरनॅशनल स्कुल.
मुले१२ वर्षे - १०० मीटर धावणे - हर्ष गुजर , अर्णव खैरनार , अथर्व खैरे .
मुले १० वर्षे - ६० मीटर धावणे - श्लोक काटे , अखिलेश शिंदे , समीप हरदास आ ि ण आकाश भोये .
लांब उडी - सार्थक अलगुडे , जीत ठाकूर, कुणाल पालवे
फोटो ;- विविध प्रकारात विजयी झालेल्या खेळाडूं, सोबत- हेमंत पांडे अािण राजीव जोशी. (25नॅशनल अ‍ॅथलॅकिक्स)

 

Web Title:   The selection of athletics players for state competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.