भगूर ज्येष्ठ नागरिक पदाधिकारी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 12:43 AM2018-05-20T00:43:35+5:302018-05-20T00:43:35+5:30

भगूर परिसर ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या अध्यक्षपदी दादासाहेब देशमुख विजयी झाले असून, उर्वरित पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड झाली आहे. भगूर परिसर ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या इमारतीमध्ये कार्यकारिणीची त्रैवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. २३८ सभासदांपैकी १५७ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. मतमोजणीत ३ मते बाद ठरविण्यात आली.

 Selection of Bhagur Senior Citizen Officer | भगूर ज्येष्ठ नागरिक पदाधिकारी निवड

भगूर ज्येष्ठ नागरिक पदाधिकारी निवड

googlenewsNext

भगूर : भगूर परिसर ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या अध्यक्षपदी दादासाहेब देशमुख विजयी झाले असून, उर्वरित पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड झाली आहे. भगूर परिसर ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या इमारतीमध्ये कार्यकारिणीची त्रैवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. २३८ सभासदांपैकी १५७ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. मतमोजणीत ३ मते बाद ठरविण्यात आली. संस्थेच्या अध्यक्षपदी दादासाहेब देशमुख ९८ मते मिळवून विजयी झाले. तर रमेश भूषणवार यांना ५६ मते मिळाली.  नवनिर्वाचित कार्यकारिणीचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी भीमराव चव्हाण, रामदास बागडे, रमेश देशमुख, रतन लोट, मधुकर भांगरे, रतन वाघचौरे, माधव देशमुख, बारकू कांडेकर आदींसह संघाचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यकारिणी जाहीर
संस्थेचे उपाध्यक्ष खंडेराव गायकवाड, सचिव काशीनाथ उबाळे, सहसचिव गुलाबराव मोरे, कोषाध्यक्ष किशोर चव्हाण व कार्यकारिणी सदस्य म्हणून शिवाजी घोरपडे, मारुती कोरडे, त्र्यंबक करंजकर, जगन्नाथ शेटे, लक्ष्मण आहेर, सतीश गरुड, सदाशिव सांबरे, तुकाराम हांडगे, सीताराम आहिरे, सुभाष बेदरकर आदींची बिनविरोध निवड झाली. निवडणूक अधिकारी म्हणून श्रीराम कातकडे, रामदास आंबेकर, राजीव गुप्ते, नारायण आडके यांनी काम पाहिले.

Web Title:  Selection of Bhagur Senior Citizen Officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक