शेतकऱ्याच्या कन्येची सशस्त्र सीमा बलात निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 06:42 PM2021-04-25T18:42:31+5:302021-04-25T18:43:48+5:30

निफाड : शिक्षण घेऊन मुली आता सर्वच क्षेत्रात भरारी घेऊन नैपुण्य दाखवत आहे. विविध विभागांत, विविध शाखेत प्रमुख म्हणून कामगिरी निभावत आहेत, परंतु वेगळ्या हिमतीची, परिश्रमाची, वेगळ्या आव्हानाची वाट ज्या क्षेत्रात आहे अशा सशस्त्र सीमा बलात निफाड तालुक्यातील गाजरवाडी येथील शेतकऱ्याची कन्या सायली बाळासाहेब गाजरे या तरुणीची निवड झाली आहे. सायली आर्मीच्या प्रशिक्षणासाठी भोपाळला रवाना झाली आहे.

Selection of a farmer's daughter by armed frontier force | शेतकऱ्याच्या कन्येची सशस्त्र सीमा बलात निवड

सायली गाजरे.

Next
ठळक मुद्देनिफाड : कठोर परिश्रमाच्या बळावर वेगळ्या आव्हानाची वाट

निफाड : शिक्षण घेऊन मुली आता सर्वच क्षेत्रात भरारी घेऊन नैपुण्य दाखवत आहे. विविध विभागांत, विविध शाखेत प्रमुख म्हणून कामगिरी निभावत आहेत, परंतु वेगळ्या हिमतीची, परिश्रमाची, वेगळ्या आव्हानाची वाट ज्या क्षेत्रात आहे अशा सशस्त्र सीमा बलात निफाड तालुक्यातील गाजरवाडी येथील शेतकऱ्याची कन्या सायली बाळासाहेब गाजरे या तरुणीची निवड झाली आहे. सायली आर्मीच्या प्रशिक्षणासाठी भोपाळला रवाना झाली आहे.

सायली हिचे प्राथमिक शिक्षण गाजरवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत तर पाचवी ते बारावी (सायन्स) पर्यतचे शिक्षण वैनतेय विद्यालयात पूर्ण केले. त्यानंतर तिने एकलहरे येथे मातोश्री कॉलेजला सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी मिळवली. तिला लहानपाणापासून आर्मीत जायचे स्वप्न होते, त्यामुळे तिने निफाड येथील पॉवर हाऊस अकॅडमीत प्रवेश घेतला. जिद्द आणि चिकाटीमुळे सरावात ती इतर मुलींपेक्षा पुढे असायची. सराव झाल्यानंतर अभ्यास करून नंतर शेतीची कामे करीत. २०१९ साली तिने आर्मीत जाण्यासाठी फॉर्म भरला व सहा महिन्यानंतर तिला मैदानी चाचणीचे हॉल तिकीट आले. मैदानी चाचणीसाठी नाशिक येथील सीआयएसएफ युनिटमध्ये तीची मैदानी सुरुवात झाली. एका शेतकर्याच्या मुलीने जिद्दीच्या जोरावर निफाड तालुक्यातील पहिली महिला फौजी घेण्याचा बहुमान मिळवला असल्याचे प्रशिक्षक असीम शेख यांनी सांगितले.
चौकट - माझी मुलगी ही लहानपणापासून जिद्दी आहे. कठोर मेहनत करणारी आहे. सिव्हिल इंजिनियर झाल्यानंतरही मला देशाच्या सेवेत जायचे आहे असे ती म्हणत होती आणि तिचे हे स्वप्न तिने जिद्दीच्या जोरावर खरे करून दाखवले. ती देशाच्या सेवेत सहभागी झाली आहे. याचा मला वडील म्हणून सार्थ अभिमान आहे.
- बाळासाहेब गाजरे, सायलीचे वडील.
 
Web Title: Selection of a farmer's daughter by armed frontier force

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.