नलिनी अहिरे यांच्या नवोपक्रमाची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 16:52 IST2021-02-08T16:51:21+5:302021-02-08T16:52:21+5:30

ओझर टाउनशिप : संशोधन विभाग पुणे राज्य शैक्षणिक संशोधन आयोजित नवोपक्रम स्पर्धा २०२१ मधील राज्यस्तरीय स्पर्धेतील गट एक ते पाचसाठीच्या पहिल्या टप्प्यातील मूल्यांकन जिल्हा व विभागस्तरावर पूर्ण करण्यात आले असून, पहिल्या फेरीतील प्रत्येक गटातील उत्कृष्ट दहा नवोपक्रमांची दुसऱ्या फेरीसाठी निवड करण्यात आली आहे. त्यात नाशिक प्राथमिक शिक्षक गटातून बाणगंगानगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील नलिनी बन्सीलाल अहिरे यांचा समावेश आहे.

Selection of Nalini Ahire's Innovation | नलिनी अहिरे यांच्या नवोपक्रमाची निवड

नलिनी अहिरे यांच्या नवोपक्रमाची निवड

दुसऱ्या फेरीतील मूल्यांकनासाठी स्पर्धकांचे झूम मीटिंगद्वारे ऑनलाइन सादरीकरण घेण्यात येणार आहे. सादरीकरण फेरीचे प्रत्येक गटासाठी एक दिवस याप्रमाणे, १० फेब्रुवारीपर्यंत पाच दिवसांच्या कालावधीत आयोजन केले आहे. या सादरीकरण फेरीतील मूल्यांकनासंदर्भात आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. नाशिकमधून पाच नवोपक्रम राज्याला पाठविले होते. त्यातून अहिरे यांच्या नवोपक्रमाची राज्याला सादरीकरण करण्यासाठी निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल शैक्षणिक क्षेत्रात कौतुक होत आहे.

Web Title: Selection of Nalini Ahire's Innovation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.