एनसीसीच्या विद्यार्थ्यांची शिबिरासाठी निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2021 08:58 PM2021-02-02T20:58:56+5:302021-02-03T00:06:06+5:30
नांदूरवैद्य : केटीएचएम महाविद्यालयातील आर्मी बॉईजचे आकाश राजेंद्र शेवकर यांची दिल्ली येथील शिबिरासाठी महाराष्ट्रातून निवड करण्यात आली तर महाविद्यालयातीलच ज्युनिअर ऑफिसर राहुल महेश ठक्कर यांची तामिळनाडू येथे झालेल्या ॲडव्हान्स लिडरशिप कॅम्प या शिबिरासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून निवड करण्यात आली.

या निवडीबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्ही.बी.गायकवाड तसेच एनसीसी आर्मी बॉईजचे प्रमुख आर.आर. शिंदे यांच्या हस्ते आकाश शेवकर व राहुल ठक्कर यांचा सत्कार करण्यात आला. तरुणांनी व्यायाम करून शारीरिक फिटनेस मजबूत करावा तसेच आहार व दैनंदिन व्यायामावर भर दिल्यास सैन्यदलातील नोकरी मिळण्यास कष्ट होणार नाही असे यावेळी आर्मी बॉईजचे प्रमुख आर.आर. शिंदे यांनी सांगितले.