खरेदी-विक्री संघाच्या पदाधिकाऱ्यांची निवड

By admin | Published: November 26, 2015 10:01 PM2015-11-26T22:01:36+5:302015-11-26T22:02:09+5:30

खरेदी-विक्री संघाच्या पदाधिकाऱ्यांची निवड

The selection of the office of procurement team | खरेदी-विक्री संघाच्या पदाधिकाऱ्यांची निवड

खरेदी-विक्री संघाच्या पदाधिकाऱ्यांची निवड

Next

लासलगाव : लासलगाव खरेदी-
विक्री संघाच्या चेअरमनपदी नानासाहेब पाटील यांची तिसऱ्यांदा निवड करण्यात आली. खरेदी-विक्र ी संघात चेअरमन व व्हा. चेअरमन निवडीसाठी खास बैठक बोलावण्यात आली होती.
ठरलेल्या आवर्तनानुसार मावळते अध्यक्ष विनायक रायते यांच्या राजीनाम्याने रिक्त जागेवर त्यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी खेडलेझुंगे येथील नितीन घोटेकर यांची निवड करण्यात आली. नानासाहेब पाटील यांच्या नावाची सूचना राजाराम मेमाणे यांनी, तर व्हा. चेअरमन नितीन घोटेकर यांच्या नावाची सूचना लक्ष्मण बडवर यांनी आणली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रकाश भालेराव यांनी काम पाहिले.
दोन्ही पदासाठी अनुक्र मे एकच अर्ज प्राप्त झाल्याने बिनविरोध निवडीची घोषणा करण्यात आली लासलगाव खरेदी-विक्री संघाची प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली असून, यापुढे संघाचे फायदे खऱ्या अर्थाने सभासदांना मिळतील. यापूर्वी संघ अडचणीत होता. गत वर्षापासून मागील सर्व देणी देऊन संघ कर्जमुक्त करून पायाभूत सुविधा उभारून उत्पन्नाचे नवनवीन स्त्रोत निर्माण केल्यामुळे संघ ऊर्जितावस्थेत आल्याचे नानासाहेब पाटील यांनी यावेळी संगितले. चेअरमन व्हा. चेअरमन निवडीप्रसंगी संघाचे मावळते अध्यक्ष व विद्यमान संचालक विनायक रायते, अनिल घोटेकर, जनार्दन जगताप, लक्ष्मण बडवर, राजाराम मेमाणे, राजेंद्र दरेकर, शंकरराव कुटे, सुरेश रायते, दिलीप शिंदे, अंबादास गायकवाड, राजाराम दरेकर, काशीनाथ मापारी, व्यवस्थापक
पी. एफ. भालेराव आदि उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: The selection of the office of procurement team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.