नाशिक मुक्त विद्यापीठ कुलगुरूपदासाठी निवड प्रक्रीया सुरू
By संदीप भालेराव | Published: August 31, 2022 08:50 PM2022-08-31T20:50:59+5:302022-08-31T20:51:17+5:30
कुलगुरू निवड प्रक्रीयेसाठी काहीसा विलंब झाला असला असून पुढील दोन महिन्यात विद्यापीठाला नूतन कुलगुरू मिळू शकतील
नााशिक: | यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीची प्रक्रिया सुरू झाली असून यापदासाठी शोध समितीकडून अर्ज मागविले आहेत. इच्छुकांना येत्या ३० सप्टेंबरपर्यंत समन्वय अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर करावे लागणार आहेत. कुलगुरू डाॅ. इ. वायुनंदन यांचा कार्यकाळ गेल्या ७ मार्च रोजी पुर्ण झाल्याने राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. पी. जी. पाटील यांच्याकडे प्रभारी कार्यभार सोपविण्यात अाला आहे.
कुलगुरू निवड प्रक्रीयेसाठी काहीसा विलंब झाला असला असून पुढील दोन महिन्यात विद्यापीठाला नूतन कुलगुरू मिळू शकतील त्या अनुषंगाने निवडप्रक्रीया रााबविली जाणार आहे. कुलगुरू पदासाठी तीन सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली असून डॉ. संदीप मिश्रा हे समन्वय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. या समितीच्या माध्यमातून कुलगुरू निवडीची प्रक्रीया पार पाडली जाणार आहे. कुलगुरू पदासाठी लागणारी पात्रतेबाबतची सविस्तर माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. कुलगुरूपदासाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी येत्या ३० सप्टेंबर किंवा तत्पूर्वी अर्ज सादर करावेत असे आवाहन शोध समितीकडून करण्यात आले आहे.