रायफल शुटर्सची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 03:53 PM2018-10-01T15:53:32+5:302018-10-01T15:53:40+5:30
कळवण :- जिल्हा क्र ीडा अधिकारी कार्यालय, नाशिक यांच्या वतीने नाशिक येथील भिष्मराज बाम मेमोरियल शुटींग रेंज येथे घेण्यात आलेल्या आंतरशालेय विभागीय रायफल शुटींग स्पर्धेत शरद पवार इंटरनॅशनल स्कूलच्या रायफल शूटर्सने उत्कृष्ट कामिगरी करीत यश संपादन केल्याने त्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
कळवण :- जिल्हा क्र ीडा अधिकारी कार्यालय, नाशिक यांच्या वतीने नाशिक येथील भिष्मराज बाम मेमोरियल शुटींग रेंज येथे घेण्यात आलेल्या आंतरशालेय विभागीय रायफल शुटींग स्पर्धेत शरद पवार इंटरनॅशनल स्कूलच्या रायफल शूटर्सने उत्कृष्ट कामिगरी करीत यश संपादन केल्याने त्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. १४ वर्षाखालील वयोगटातील मुलींच्या १० मीटर ओपनसाईट एअर रायफल स्पर्धेत गौरी चव्हाणके प्रथम व तेजल देवरे तृतीय स्थान मिळविले. तर १७ वर्षाखालील वयोगटातील १० मीटर ओपनसाईट एअर रायफल स्पर्धेत नम्रता नवले व एअर पिस्तोल खेळ प्रकारात किश्मरा पाटील यांनी प्रत्येकी तृतीय स्थान पटकावले. १७वर्षाखालील वयोगटातील १०मीटर ओपनसाईट एअर रायफल स्पर्धेत तनिष्क वाघ प्रथम, वेद रौंदळ व्दितीय तर पिप साईट एअर रायफल प्रकारात संकेत पगार व्दितीय स्थान प्राप्त केले. १७ वर्षाखालील वयोगटातील एअर पिस्तोल प्रकारात ऋषीकेश मोरे तृतीय तर १९ वर्षाखालील वयोगटात प्रतिक भामरेने यश मिळविले. १९वर्षाखालील वयोगटातील १० मीटर ओपनसाईट एअर रायफल स्पर्धेत साहिल मानकरने व्दितीय स्थान पटकावले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांची निवड राज्यपातळीवरील स्पर्धेसाठी करण्यात आलेली आहे. त्यांच्या या उज्ज्वल कामिगरीसाठी त्यांना शाळेचे रायफल शुटींग प्रशिक्षक देविदास सुडके यांचे मार्गदर्शन लाभले.या यशस्वी खेळाडूंचे शाळेचे संस्थापक डॉ. जे. डी. पवार , सप्तश्रुंगी महिला बँकेच्या अध्यक्षा मीनाक्षी पवार, शाळेचे अध्यक्ष शैलेश पवार, सचिव अनुप पवार,आदींनी अभिनंदन केले.