श्री संत हरिबाबा विद्यालयाची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:24 AM2021-03-04T04:24:36+5:302021-03-04T04:24:36+5:30
‘स्मॉल इज ब्युटीफुल’ या उपक्रमांतर्गत गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव व मराठी विज्ञान परिषदेद्वारा आयोजित राष्ट्रीय नवसंशोधन स्पर्धा पार पडली. ...
‘स्मॉल इज ब्युटीफुल’ या उपक्रमांतर्गत गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव व मराठी विज्ञान परिषदेद्वारा आयोजित राष्ट्रीय नवसंशोधन स्पर्धा पार पडली. श्री संत हरिबाबा या विद्यालयातील दोन विद्यार्थ्यांच्या प्रयोगाची राष्ट्रीय प्राथमिक स्तरावर निवड झाली आहे. कुमारी अन्वेषा प्रकाश निरगुडे (५ वी, छोटा गट) या विद्यार्थिनीने ‘पर्यावरण वाचवा आणि जीव वाचवा’ या विषयावर प्रयोग सादर केला, तर मोठ्या गटात प्रसाद चंद्रभान पगार आणि श्रेयस बंडू पगार (इयत्ता १० वी) या विद्यार्थी संघाने ‘सलाइन टुयनर’ हा प्रयोग सादर केला. याकामी विद्यार्थ्यांना विज्ञान विभागप्रमुख एम. डी. मुरकुटे व विज्ञान विषय शिक्षक एस. यू. उंबरे, एच. व्ही. सगळे, ए. एन. डौरे व विद्यालयाचे मुख्याध्यापक डी. बी. गोसावी यांचे मार्गदर्शन लाभले.
फोटो ओळी- ०२अन्वेषा निरगुडे
फोटो ओळी - ०२प्रसाद पगार व श्रेयस पगार.
===Photopath===
020321\02nsk_10_02032021_13.jpg~020321\02nsk_11_02032021_13.jpg
===Caption===
फोटो ओळी- ०२अन्वेषा निरगुडे~फोटो ओळी - ०२प्रसाद पगार व श्रेयस पगार.