स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 01:43 AM2018-08-24T01:43:56+5:302018-08-24T01:44:28+5:30
लासलगाव : स्वच्छ सर्वेक्षण (ग्रामीण) २०१८ अंतर्गत पिंपळगाव नजीक या ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली आहे. गावात कुठेही उघड्यावर कचरा फेकला जात नाही. गावातील प्राथमिक शाळा, अंगणवाड्या, उपकेंद्र, धार्मिक स्थळ यांची स्वच्छतेबाबतची पाहणी आलेल्या पथकाने केली. यानिमित्ताने गावात उघड्यावर कचरा करणार नाही तसेच प्लॅस्टिकचा वापर कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्धार केला.
लासलगाव : स्वच्छ सर्वेक्षण (ग्रामीण) २०१८ अंतर्गत पिंपळगाव नजीक या ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली आहे.
गावात कुठेही उघड्यावर कचरा फेकला जात नाही. गावातील प्राथमिक शाळा, अंगणवाड्या, उपकेंद्र, धार्मिक स्थळ यांची स्वच्छतेबाबतची पाहणी आलेल्या पथकाने केली. यानिमित्ताने गावात उघड्यावर कचरा करणार नाही तसेच प्लॅस्टिकचा वापर कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्धार केला.
घरातील सुका कचरा व ओला कचरा असा वेगवेगळा साठवून त्याचे व्यवस्थापन ग्रामपंचायतीमार्फत लावण्याचा निर्धार केला. ग्रामविकास अधिकारी यांनी सर्व गावकऱ्यांना गावातील स्वच्छतेत कायम सातत्य राहील तसेच गावात ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा करून घंटागाडीत टाकावा, असे आवाहन केले. निफाड तालुका ग्रामसेवक संघटनेचे मार्गदर्शन लाभले तसेच गावकºयांचे व सहकाºयांचे आभार मानले.